मुंबई, 10 ऑक्टोबर: राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि उद्याच्या आधी समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल.
नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे प्रदान करावी लागतील. फेरी 1 ची समुपदेशन प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल. समुपदेशनासाठी काही महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
काही महत्त्वाच्या तारखा
नोंदणीची सुरुवात - 11 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022
निवड भरणे – 14 ऑक्टोबर 2022
चॉईस फिलिंग आणि लॉकिंगची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२२
अंतर्गत उमेदवारांची पडताळणी – 17-18 ऑक्टोबर 2022
शीट वाटपाची प्रक्रिया – 19 -20 ऑक्टोबर 2022
फेरी 1 जागा वाटप निकाल – 21 ऑक्टोबर
अहवाल - 23-28 ऑक्टोबर 2022
UPSC Recruitment 2022: अर्जाचं शुल्क फक्त 25 रुपये आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; ही घ्या अप्लाय लिंक
त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी समुपदेशनाची प्रक्रिया २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जी 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर, MCC ने एक मॉप अप फेरी आयोजित करण्यात येणार आहे. हे उल्लेखनीय आहे की NEET UG च्या 15% अखिल भारतीय कोट्यासाठी आणि डीम्ड विद्यापीठे, ESIC, AFMS, AIIMS आणि JIPMER मधील सर्व जागांसाठी MCC द्वारे समुपदेशन केले जाईल.
काउन्सिलिंग साठी आवश्यक कागदपत्रं तयार ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. काउन्सिलिंग साठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
SBI PO Recruitment: विसरलात तर नाही ना? 68,000 रुपये पगाराची नोकरी; अवघे दोन दिवस शिल्लक
ही कागदपत्रं आवश्यक
NEET रँक कार्ड
NEET प्रवेशपत्र
डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
इयत्ता 10, 12 ची मार्कशीट
Address प्रूफ
कॅरेक्टर सर्टिफिकेट
मायग्रेशन सर्टिफिकेट
वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो इ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Jobs Exams, Medical exams