मुंबई, 25 ऑक्टोबर: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा- अंडरग्रेजुएट (NEET UG 2022) दुसरी फेरी काउन्सिलिंग लवकरच सुरू होणार आहे. त्याचा दुसरा 2 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. MCC ने अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नोंदणी करू शकतात. 07 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे शुल्क भरता येणार आहे. चॉईस फिलिंग 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर रात्री 11:55 वाजता फिलिंगसह लॉक केले जाऊ शकते.
दुसऱ्या फेरीचा निकाल कधी लागेल
विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी 7 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित विद्यापीठ आणि संस्थेत केली जाईल. दुसऱ्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर, उमेदवारांना 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाटप केलेल्या संस्थेत प्रवेशासाठी अहवाल द्यावा लागेल.
SBI Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1422 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; स्टेट बँकेत जॉब्सचा पाऊस
या असतील महत्त्वाच्या तारखा
दुसऱ्या फेरीच्या काउन्सिलिंगची नोंदणी - 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022
फी जमा करण्याची तारीख – 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022
चॉइस फिलिंग आणि लॉकिंग - 3 ते 8 नोव्हेंबर 2022
कागदपत्रांची पडताळणी - 7 ते 8 नोव्हेंबर 2022
जागा वाटप - 9 ते 10 नोव्हेंबर 2022
NEET UG फेरी 2 जागा वाटप निकाल - 11 नोव्हेंबर 2022
संस्थेत रिपोर्टिंग - 12 ते 18 नोव्हेंबर 2022
Success Story: आयुष्यात सतत रिजेक्शनचा सामना करत शोधली वाट; उभी केली 2000 कोटींची कंपनी
अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन
सर्वप्रथम MCC च्या अधिकृत वेबसाईट mcc.nic.in वर जा.
UG वैद्यकीय समुपदेशनासाठी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी लिंकवर जा आणि तुमचा तपशील भरा आणि पोर्टलवर नोंदणी करा.
आता लॉगिनसह नोंदणी फॉर्म पूर्ण करा.
कागदपत्रे अपलोड करा आणि नोंदणी शुल्क जमा करा.
आता तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Education, Entrance Exams, Job alert, Jobs Exams, Medical exams