मुंबई, 21 ऑक्टोबर: वैद्यकीय समुपदेशन समिती, MCC ने NEET UG समुपदेशन फेरी 1 साठी जागा वाटपाचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर NEET UG च्या समुपदेशनात सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. आता जागा वाटप झालेल्या उमेदवारांना 28 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे आणि शुल्क सादर करावे लागणार आहे.
यापूर्वी, MCC ने 20 ऑक्टोबर रोजी NEET UG समुपदेशनाचा तात्पुरता निकाल जाहीर केला होता. ज्यावर आज सकाळी ८ वाजेपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. लक्षात ठेवा उमेदवारांनी त्यांच्या संबंधित महाविद्यालयात जागा वाटपाचा निकाल आणि वाटप पत्र घेऊन पोहोचणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वेबसाइटवरून तुमचे पत्र आणि निकाल डाउनलोड करा.
कम्प्युटर सायन्स न शिकताही करू शकता आयटीमध्ये करिअर; कसं? जाणून घ्या
काही महत्त्वाच्या तारखा
जागा वाटपाचा अंतिम निकाल – 21 ऑक्टोबर 2022
वाटप केलेल्या जागेवर अहवाल देण्यास सुरुवात - 21 ऑक्टोबर
कॉलेजमध्ये रिपोर्ट करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर आहे
फेरी 2 जागा वाटपासाठी नोंदणीची सुरुवात – 2 नोव्हेंबर
महत्त्वाची बातमी! ITI च्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स देतंय रोजगाराची संधी
NEET UG 2022 समुपदेशन फेरी 1 ची तात्पुरती जागा वाटप रँक, वाटप केलेला कोटा, वाटप केलेली संस्था, अभ्यासक्रम, वाटप केलेली श्रेणी, उमेदवार श्रेणी या आधारे केली जाते. उमेदवारांना 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देता येईल. MCC 2 नोव्हेंबर 2022 पासून फेरी 2 समुपदेशनासाठी नोंदणी सुरू करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Medical exams