मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET Counselling: निकाल तर लागला पण आता पुढे काय? कशी मिळेल मेडिकल कॉलेजमध्ये Admission? अशी असेल प्रोसेस

NEET Counselling: निकाल तर लागला पण आता पुढे काय? कशी मिळेल मेडिकल कॉलेजमध्ये Admission? अशी असेल प्रोसेस

 कशी मिळेल मेडिकल कॉलेजमध्ये Admission? अशी असेल प्रोसेस

कशी मिळेल मेडिकल कॉलेजमध्ये Admission? अशी असेल प्रोसेस

NEET काउन्सिलिंग चार फेऱ्यांमध्ये केले जाण्याची शक्यता आहे. तरीही जागा रिक्त राहिल्यास, अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या जाऊ शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 सप्टेंबर: NEET UG परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला. 17,64,571 परीक्षार्थींपैकी एकूण 9,93,069 उमेदवार भारतातील सर्वात मोठ्या वैद्यकीय परीक्षेसाठी पात्र ठरले आणि 56.27 टक्के उत्तीर्ण झाले. आता, परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार NEET UG काउन्सिलिंग फेरीत बसण्यास पात्र आहेत, जी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. NEET काउन्सिलिंग चार फेऱ्यांमध्ये केले जाण्याची शक्यता आहे. तरीही जागा रिक्त राहिल्यास, अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या जाऊ शकतात. प्रथम, काउन्सिलिंग लिंक सक्रिय झाल्यानंतर सर्व पात्र उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवारांना त्यांना अर्ज करायचा असलेले महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडावे लागतील, ज्याच्या आधारे आणि त्यांच्या NEET गुणवत्तेनुसार, विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप केले जाईल.

NEET UG च्या निकालानंतर, बोर्डाकडून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं जे दोन कोट्यातील उमेदवारांसाठी 15 टक्के अखिल भारतीय कोटा आणि 85 टक्के राज्य कोटा आहे.

काय सांगता काय? LIC मध्ये थेट अधिकारी पदांवर नोकरी तेही मुंबईत; तुम्ही आहात का पात्र? इथे मिळतील डिटेल्स

NEET मध्ये 15% AIQ जागांसाठी काउन्सिलिंग वैद्यकीय काउन्सिलिंग समिती (MCC) द्वारे mcc.nic.in वर केलं जातं. हे काउन्सिलिंग सर्व सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये तसेच डीम्ड आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी आयोजित केले जाते. उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी की जम्मू आणि काश्मीरमधील उमेदवार NEET 2022 AIQ काउंसिलिंग 2022 मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. अशा उमेदवारांनी NEET 2022 राज्य कोट्याद्वारे अर्ज करावा.

कशी असेल पुढील प्रक्रिया

NEET काउन्सिलिंग च्या पहिल्या फेरीची जागा वाटप यादी जाहीर झाल्यानंतर, एखाद्या उमेदवाराला पसंतीचे कॉलेज/कोर्स मिळाल्यास, त्यांना फी जमा करावी लागेल आणि जागा बुक करण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. नसल्यास, ते सीट फ्लोट करू शकतात आणि पुढील फेरीची प्रतीक्षा करू शकतात. रिक्त जागा पुढील फेरीत मिळतील. दुस-या फेरीत, मॉप-अप राऊंडमध्ये अपग्रेडेशनचा पर्याय नसेल.

यंदा टॉप मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणं होणार सोपं? NEET चा Cut-off घसरला

NEET 2022 राज्य कोटा काउन्सिलिंग म्हणजे काय?

NEET 2022 साठी 85 टक्के राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग संबंधित राज्य प्राधिकरण त्यांच्या वेबसाइटवर करतील. सर्वसाधारणपणे, NEET 2022 राज्यकाउन्सिलिंगसाठी एकूण तीन फेऱ्या घेतल्या जातात. राज्य कोट्यासाठी NEET 2022 काउन्सिलिंग त सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अधिवास पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Medical exams