• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • NEET UG 2021: परीक्षेच्या तारखेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; 'या' तारखेलाच होणार परीक्षा

NEET UG 2021: परीक्षेच्या तारखेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; 'या' तारखेलाच होणार परीक्षा

यासंबंधी सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: NEET UG 12 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. त्यामुळे या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र (NEET UG & PG Admit Card) लवकरच अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत. NEET UG परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) घेतली जाणार आहे. मात्र NEET UG  (NEET UG Final exam date) परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा स्थगित करण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती.  यासंबंधी सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टानं ही परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधीची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा ठरलेल्या वेळेत म्हणजेच 12 सप्टेंबर 2021 ला होणार आहे.   गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सोशल मीडियावर आणि देशात विद्यार्थ्यांकडून NEET UG ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि परीक्षेच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल हे कारण पुढे करण्यात आलं होतं. हे वाचा -  वाह रे पठ्ठ्या! कंपनीनं क्रेडिट कार्ड देण्यास दिला नकार तर सुरु केली कंपनी मात्र आता अजून ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हंटलं आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून  जी तारीख जाहीर करण्यात आली आहे त्याच तारखेला NEET UG परीक्षा होणार आहे. NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्रं (How to download admit cards for NEET UG and NEET PG exams) 9 सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थी अधिकुत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published: