मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET UG 2021: NTA नं वाढवला अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा कालावधी; आता ही असेल लास्ट डेट

NEET UG 2021: NTA नं वाढवला अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा कालावधी; आता ही असेल लास्ट डेट

आता NTA नं ही तारीख वाढवली आहे.

आता NTA नं ही तारीख वाढवली आहे.

आता NTA नं ही तारीख वाढवली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: जर तुम्हला डॉक्टर (Doctor career) व्हायचं असेल तर NEET ही परीक्षा (NEET UG 2021) देणं अतिशय अनिवार्य आहे. ही परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण केल्यानंतरच आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश (Medical College Admissions) मिळतो. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन (NEET UG Registration) काही दिवसांपूर्वी झालं आहे. त्यानुसार 6 ऑगस्टला या परीक्षेसाठी अप्लिकेशन फॉर्म (NEET application form) भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता NTA नं ही तारीख वाढवली आहे.

NTA नं  NEET UG 2021 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठीची अंतिम तारीख (NEET UG application Last date) वाढवली आहे. इच्छुक उमेदवार आता NEET UG 2021 चा अप्लिकेशन फॉर्म 10 ऑगस्ट संध्याकाळी 05 पर्यंत भरू शकणार आहेत. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 06 ऑगस्टपर्यंत होती. त्यामुळे NEET UG देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

हे वाचा - BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती

कधी आहे परीक्षा

NEET 2021 परीक्षेची तारीख 12 सप्टेंबर 2021 आहे. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. भारतातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ही परीक्षा देऊ शकणार आहेत.  ऑनलाइन अप्लिकेशनसाठीची लिंक अधिकृत वेबसाइट- neet.nta.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करेक्शन करण्यासाठीही वेळ

B.sc नर्सिंग उमेदवारांसाठीही मुदत वाढवण्यात आली आहे. NEET UG अप्लिकेशन 10 ऑगस्ट रोजी रात्री 11:50 पर्यंत भरता येईल. मात्र अप्लिकेशन करेक्शन विंडो 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दुपारी 2 वाजता खुली राहणार आहे.

First published: