मराठी बातम्या /बातम्या /करिअर /'अशी' Crack करा NEET 2021 परीक्षा; 720 पैकी 720 गुण मिळवणाऱ्या टॉपरनं दिल्या महत्त्वाच्या टिप्स; एकदा जरूर वाचा

'अशी' Crack करा NEET 2021 परीक्षा; 720 पैकी 720 गुण मिळवणाऱ्या टॉपरनं दिल्या महत्त्वाच्या टिप्स; एकदा जरूर वाचा

NEET परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एका टॉपरनं विद्यार्थ्यांना टिप्स (How to crack NEET exam in single attempt) दिल्या आहेत.

NEET परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एका टॉपरनं विद्यार्थ्यांना टिप्स (How to crack NEET exam in single attempt) दिल्या आहेत.

NEET परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एका टॉपरनं विद्यार्थ्यांना टिप्स (How to crack NEET exam in single attempt) दिल्या आहेत.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवणायसाठी याआधी NEET ही परीक्षा (NEET Exam 2021) उत्तीर्ण करावी लागते. मात्र हे परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे कोणत्या येड्या गबाळ्याचं काम नाही. हे परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम आणि मेहनतीची गरज असते. त्यात आता तर NEET 2021 PG आणि NEET 2021 UG हे परीक्षा अगदी तोंडावर आहेत. NEET 2021 PG परीक्षा 11 सप्टेंबरला तर NEET 2021 UG 12 सप्टेंबरला होणार आहे. मात्र कोणतीही परीक्षा crack करण्यासाठी अनुभवी लोकांची मदत (Tips for NEET exam) घ्यावी. म्हणूनच NEET परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एका टॉपरनं विद्यार्थ्यांना टिप्स (How to crack NEET exam in single attempt) दिल्या आहेत.

कुशीनगर उत्तर प्रदेशची रहिवासी आकांक्षा सिंह (Akansha Singh NEET Topper) ही NEET परीक्षेत अव्वल येणारी पहिली महिला विद्यार्थी बनली होती. तिनं या परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवले होते. आकांक्षा सध्या AIIMS Delhi इथे शिक्षण घेत आहे. कोणत्याही मेडिकल प्रवेशासाठी तयारी आधीपासूनच सुरू करावी लागते. त्याप्रमाणे आकांक्षानं दहावीतच तयारी सुरु केली होती असं ती सांगते.

यंदाच्या 2021 च्या बॅचप्रमाणे गेल्या वर्षी देखील वैद्यकीय प्रवेश परीक्षेबद्दल बरीच अनिश्चितता होती. मात्र बाहेरची गडबड असूनही तुमच्या मनाला शांत ठेवणे ही मुख्य गोष्ट आहे. “मी शेवटच्या तयारीचं  घेतले आणि परीक्षांच्या तारखांना होणारा विलंब संकल्पना सुधारण्याची संधी म्हणून घेतला. बाहेरच्या वातावरणाची पर्वा न करता, मी माझ्या आवडीचं  पालन केलं आणि परीक्षेला बसताना आवश्यक ती खबरदारी घेतली," असं आकांक्षा सांगते.

टाइम टेबल करणं महत्त्वाचं

ट्रॅकवर आणि शांत राहण्यासाठी आकांक्षानं वेळापत्रक तयार केलं. तिनं दावा केला की तिनं सर्व विषयांवर समानतेनं लक्ष केंद्रित केलं आणि संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं म्हणूनच ती यशस्वी होऊ शकली.

“माझ्यासाठी, मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि अनेक पुस्तकांचा संदर्भ देऊन गोंधळात पडण्याऐवजी त्यातून जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं हे प्राधान्य होतं,” असं तिनं न्यूज 18 डॉट कॉमला सांगितलं.

परीक्षेत योजना आखून प्रश्न सोडवणं महत्त्वाचं

परीक्षा देताना मी आधी सोप्या प्रश्नांचा प्रयत्न केला, त्यानंतर कठीण किंवा सिद्धांतावर आधारित प्रश्न सोडवले. “मी प्रथम भौतिकशास्त्राशी संबंधित प्रश्न पूर्ण केले कारण या विषयाकडे माझा कल होता आणि नंतर इतर प्रश्न केले. मी खात्री केली की माझ्याकडे ओव्हर लुकिंगसाठी शेवटी 30-40 मिनिटं आहेत याप्रमाणे परीक्षा दिली" असंही आकांक्षा सांगते.

हे वाचा - Career Advice: म्युझिओलॉजी म्हणजे आहे तरी काय? ग्रॅज्युएशननंतर करिअरची संधी

मॉक पेपर्स सोडवा

"टाइम मॅनेजमेंटसाठी मी बर्‍याच मॉक पेपरद्वारे सराव केला आणि दोन तासांच्या आत ते सोडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मला मुख्य परीक्षेच्या वेळी वेळ चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यात मदत झाली," असंही ती म्हणते.

Success मंत्र

“वेळापत्रकाचं पालन करा, स्मार्ट काम करा, तयारीच्या सीमा परिभाषित करा, प्रचंड मेहनत करा आणि आत्मविश्वास गमावू नका यावरच तुम्हाला NEET प्रतीक्षा पास करता येईल" असं आकांक्षा सांगते.

First published:
top videos

    Tags: Entrance exam, Medical, Medical exams