Home /News /career /

NEET Result 2021: विद्यार्थ्यांनो, NEET 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; अशा पद्धतीनं बघता येणार तुमचं Score Card

NEET Result 2021: विद्यार्थ्यांनो, NEET 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; अशा पद्धतीनं बघता येणार तुमचं Score Card

अखेर NEET 2021 या परीक्षेचा निकाल (NEET 2022 Result) जाहीर करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: बहुप्रतीक्षित NEET 2021 चा निकाल (NEET 2022 Result updates) अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजंसीनं (National Testing Agency) हा निकाल जाहीर केला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा उशिरा घेण्यात आली होती. त्यात या परीक्षेत घोळ झाल्यामुळे अनेकांना या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. मात्र आता अखेर NEET 2021 या परीक्षेचा निकाल (NEET 2022 Result) जाहीर करण्यात आला आहे. NTA कडून सर्व विद्यार्थ्यांना Score Card (How to get NEET 2022 Result score card) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. NEET 2021 साठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरित्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पात्रतेच्या वेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एकत्रितपणे किमान 50% गुण प्राप्त केलेले असणं आवश्यक आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA यावेळी उमेदवारांना NEET 2021 चा निकाल ईमेलद्वारे पाठवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे scorecard मिळण्यासाठी अधिक कष्ट घेण्याची गरज भासणार नाहीये. NEET 2021 परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी mcc.nic.in वर अर्ज करण्यास पात्र असतील. अंडरग्रेजुएट मेडिकल / डेंटल कोर्सेसच्या सर्व जागांचे प्रवेश NEET (UG) – 2021 द्वारे केले जातील. वेगवेगळ्या कोट्यांतर्गत या जागा उपलब्ध असणार आहेत. काउन्सिलिंगला ही कागदपत्रं महत्त्वाची NEET 2021 चे प्रवेशपत्र NEET 2021 चे निकाल किंवा रँक लेटर दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र सरकारने जारी केलेला फोटो आयडी पासपोर्ट आकाराचे फोटो जात प्रमाणपत्र लागू असल्यास
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Exam result

    पुढील बातम्या