नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: बहुप्रतीक्षित NEET PG ही परीक्षा (NEET PG exam 2021) येत्या 11 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र (How to download NEET PG Admit Card) आजपासून अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले प्रवेशपत्रं डाउनलोड करायचे आहेत. तसंच परीक्षेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचनाही (Important Guidelines) वाचायच्या आहेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
याआधी NEET PG परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार होती आणि त्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने प्रवेशपत्रंही दिली होती. मात्र यापूर्वी जारी केलेले प्रवेशपत्रं यापुढे परीक्षेसाठी वैध राहणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उमेदवारांना आता नवीन प्रवेशपत्रं डाउनलोड करावे लागणार आहेत.
अशा पद्धतीनं डाउनलोड करा
सर्वप्रथम nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर ओपन केल्यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करा.
हे वाचा - NEET UG 2021: परीक्षेच्या तारखेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
आता तुमचं प्रवेशपत्र स्क्रीनवर येईल.
तुमचं प्रवेशपत्र नीट बघून घ्या आणि डाउनलोड करा.
परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जा यासाठी त्याची प्रिंट काढून ठेवा.
NEET UG चं प्रवेशपत्र 9 सप्टेंबरला
NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्रं (How to download admit cards for NEET UG and NEET PG exams) 9 सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थी अधिकुत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.