Home /News /career /

NEET PG 2022: उमेदवारांनो, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही; याच महिन्यात होणार परीक्षा

NEET PG 2022: उमेदवारांनो, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही; याच महिन्यात होणार परीक्षा

NEET PG ही परीक्षा वेळेतच

NEET PG ही परीक्षा वेळेतच

यंदा NEET PG ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र आता NTA नं ही परीक्षा वेळेतच घेण्यात येणार असं जाहीर केलं आहे.

    मुंबई, 04 मे: पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात येणारी NEET परीक्षा (NEET PG Exam 2022) ही लवकरच घेण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेसाठी नोंदणी करतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी ही प्रवेश परीक्षा अत्यंत अवघड असते आणि त्यात काही हजार विद्यार्थीच यशस्वी होतात. यंदा NEET PG ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र आता NTA नं ही परीक्षा वेळेतच घेण्यात येणार असं जाहीर केलं आहे. Career Tips: ऑफिसमध्ये 'या' ट्रिक्स वापरून Boss होईल खुश; मिळेल Promotion NEET PG 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी असूनही, NEET PG परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल केला जात नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता या PG अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अंतिम पुनरावृत्ती सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा नियोजित तारखेलाच NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ती पुढे ढकलण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर बराच काळ सुरू होता. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता त्यांना पूर्वनिश्चित तारखेलाच NEET परीक्षा द्यावी लागेल. 30 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनो, NEET एका प्रयत्नात होईल क्रॅक; 'या' टिप्समुळे होईल स्वप्न पूर्ण का होतेय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी NEET PG 2021 समुपदेशनाला उशीर झाल्यामुळे आणि प्रवेश परीक्षा आणि समुपदेशन वेळापत्रकात कमी अंतर यामुळे, अनेक उमेदवार NEET PG परीक्षा 2022 पुढे ढकलण्याची मागणी करत होते. तयारीसाठी फारसा वेळ मिळत नसल्याने तणाव निर्माण होतो, असे त्यांचे मत होते. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Medical exams

    पुढील बातम्या