Home /News /career /

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो , 'या' तारखेला जारी होणार Admit Card; अशा पद्धतीनं करा डाउनलोड

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो , 'या' तारखेला जारी होणार Admit Card; अशा पद्धतीनं करा डाउनलोड

आता NEET परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: NEET UG आणि  NEET PG ची परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे.  NEET PG ही परीक्षा 11 सप्टेंबर 2021 रोजी तर  NEET UG 12 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. त्यामुळे या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र (NEET UG & PG Admit Card) लवकरच अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत. NEET UG परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) घेतली जाणार आहे  NEET PG परीक्षा राष्ट्रीय शिक्षण मंडळाद्वारे (NEB) घेतली जाणार आहे. आता NEET परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी लवकरच आपलं प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड (NEET UG and NEET PG Exam dates)  करू शकणार आहेत. या पूर्वीच्या तारखेच्या म्हणजेच 18 एप्रिलच्या नियोजित परीक्षेसाठी पूर्वी जारी केलेले प्रवेशपत्र  वैध नाहीत. उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागणार आहे. हे वाचा - राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे इथे 'या' पदांसाठी नोकरची संधी; ई-मेलवर करा अर्ज NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्रं (How to download admit cards for NEET UG and NEET PG exams) 9 सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थी अधिकुत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत. या तारखांना मिळू शकतं Admit card neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून NEET PG साठी उमेदवारांना Admit card डाउनलोड करता येणार आहे. तर nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून NEET UG साठी उमेदवारांना Admit card डाउनलोड करता येणार आहे. NEET UG चे प्रवेशपत्र 9 सप्टेंबर 2021 ला जारी केले जाणार आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Entrance exam

    पुढील बातम्या