• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • NEET 2021 Leaked: NEET परीक्षेचा पेपर फुटल्याची सोशल मीडियावर चर्चा; पण अधिकारी म्हणतात...

NEET 2021 Leaked: NEET परीक्षेचा पेपर फुटल्याची सोशल मीडियावर चर्चा; पण अधिकारी म्हणतात...

NEET 2021 परीक्षेचा पेपर फुटल्याची (NEET 2021 Leaked) चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच जोर धरत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: NEET 2021 परीक्षेचा पेपर फुटल्याची (NEET 2021 Leaked) चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच जोर धरत आहे. ट्विटर कथित वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळ्याच्या (NEET 2021 paper) प्रतिक्रियांनी भरलं आहे. एका टीव्ही वृत्तवाहिनीनं तपासात एक प्रकरण प्रसारित केल्यानंतर हे अहवाल समोर आले की त्यामागे एका माफियाचा हात आहे. मात्र कोणत्याही अहवालात NEET 2021 ची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा पुरावा देण्यात आलेला नाही. अधिकारी मात्र या पेपर फ़ुटकायच्या बातमीला खोटं सांगतात. जेव्हा न्यूज 18 डॉट कॉमने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अशा कोणत्याही तक्रारी आल्याचं नाकारलं  आणि सांगितलं की या अफवा आहेत. "हे सर्व बनावट आहे. विद्यार्थ्यांना अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला आम्ही देतो, "असं  अधिकारी म्हणाले ज्यांनी सांगितले की सुरक्षा यंत्रणांमध्ये कोणतीही अनियमितता किंवा निष्काळजीपणा झाला आहे. TCS Rebegin: TCS मध्ये महिलांसाठी होणार बंपर भरती; अशा पद्धतीनं करा अर्ज; जाणून घ्या पात्रता NTA ने नुकतेच NEET साठी प्रवेशपत्रे पुन्हा जारी केल्यामुळे अफवा उडू शकल्या असत्या . मात्र NTA चं म्हणणं आहे की सुधारित प्रवेशपत्रं जारी केली गेली कारण काही विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड प्रतिमांसह समस्या येत होत्या. JEE च्या परीक्षेतही झाला घोटाळा यापूर्वी JEE Mains च्या परीक्षेतही काहो खासगी इन्टिट्यूट्सकडून घोटाळा करण्यात आलं आहे. यासंबंधी CBI ची छापेमारी झाली आहे आणि पुढील चौकशी सुरु आहे. मात्र तूर्तास NEET परीक्षा leak झाल्याच्या चर्चांना अधिकाऱ्यांनी पूर्णविराम दिला आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: