मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NDMA Recruitment 2023: ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; लगेच करा अप्लाय

NDMA Recruitment 2023: ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; लगेच करा अप्लाय

NDMA Recruitment 2023

NDMA Recruitment 2023

NDMA रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, 4 जागा रिक्त आहेत. तसेच निवडलेल्या उमेदवारांना 175000 पर्यंत मासिक पगार मिळेल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च: नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीने सीनिअर कन्सल्टंट, कन्सल्टंट (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), कन्सल्टंट(नेटवर्क मॅनेजमेंट) आणि कन्सल्टंट (सायबर सिक्युरिटी) या पदांसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. NDMA रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, 4 जागा रिक्त आहेत. तसेच निवडलेल्या उमेदवारांना 175000 पर्यंत मासिक पगार मिळेल. या संदर्भात 'studycafe' ने वृत्त दिलंय.

रिक्त पदांची नाव आणि भरावयाच्या जागा

सीनिअर कन्सल्टंट - 01

कन्सल्टंट (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) - 01

कन्सल्टंट (नेटवर्क मॅनेजमेंट) - 01

कन्सल्टंट (सायबर सिक्युरिटी) - 01

Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

पात्रतेच्या अटी

सीनिअर कन्सल्टंट

उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग, अर्थशास्त्र, आर्किटेक्चर, सोशल सायन्सेस, जिओइन्फॉरमॅटिक्स, अर्बन प्लॅनिंग, पब्लिक पॉलिसी अँड डेव्हलपमेंट प्लॅनिंग, डिझास्टर मॅनेजमेंट किंवा संबंधित विषयात मास्टर्स पदवी पूर्ण केली असणे आवश्यक आहे. किंवा सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी 8700 ग्रेड वेतनासह (प्री-रिवाईज्ड) लेव्हल 13 (7वी सीपीसी) आणि त्यावरील संबंधित क्षेत्रातील किमान 5-10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शन कार्यक्रम हाताळण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. पीएच.डी. डिग्री असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांना रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शन संबंधित समस्यांची चांगली समज आणि ज्ञान असणे आवश्यक आहे.

CCL Recruitment 2023: तब्बल 1,50,000 रुपये सॅलरी आणि सरकारी जॉब; अजून काय हवं? संधी सोडू नका

कन्सल्टंट (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)

उमेदवारांकडे B.E/B. Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT) डिग्री असणं आवश्यक आहे. त्यात मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंटेशन व ऑपरेशनचा अनुभव असावा. M. Tech/ MCA (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

कन्सल्टंट (नेटवर्क मॅनेजमेंट)

उमेदवारांकडे B.E/B. Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT) डिग्री असणं आवश्यक आहे. त्यात मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंटेशन व ऑपरेशनचा अनुभव असावा. M. Tech/ MCA (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT) असलेल्या तसेच CCNA सारख्या नेटवर्क मॅनेजमेंटमधील प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

कन्सल्टंट (सायबर सिक्युरिटी)

उमेदवारांकडे B.E/B. Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT) डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्युरिटी संबंधित संस्थांमध्ये इम्प्लिमेंटेशन व ऑपरेशनल अनुभव असावा. CCNP/CEH/CISSP/CISA/CCSP इत्यादी सारख्या सायबर सुरक्षा क्षेत्रात M. Tech/ MCA (कॉम्प्युटर सायन्स किंवा IT), प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.

अनुभव

सीनिअर कन्सल्टंट

उमेदवारांना डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स व प्रोग्राम्समध्ये किमान 5-10 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटवर काम करणे किंवा रिकव्हरी प्रोजेक्ट राबवण्याचा अनुभवही चालेल. उमेदवारांना उत्तम इंग्रजीचं ज्ञान असावं. कारण पदासाठी आपत्तीतील जोखीम कमी करणे आणि संबंधित अनेक पैलूंबाबत राष्ट्रीय आणि राज्य संस्थांशी पत्रव्यवहार करावा लागू शकतो.

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

कन्सल्टंट (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)

उमेदवारांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विविध सरकारी पोर्टल्सचे मॅनेजमेंट, ईऑफिस मॅनेजमेंट, NIC क्लाउड सर्व्हिस, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवांचे व्यवस्थापन आणि वेबसाइट व्यवस्थापन या विषयातील उत्कृष्ट ज्ञान, वेबसाइट मॅनेजमेंट या क्षेत्रातील 3-5 वर्षांचा अनुभव असावा, उमेदवारांना किमान Drupal किंवा WordPress सारख्या कोणत्याही एका CMSचे ज्ञान असावे. उमेदवारांना ई-ऑफिस मॅनेजमेंटचे उत्तम ज्ञान असावे. त्यांना नवीन व्हीएम, पब्लिक आयपी, डोमेन नाव नोंदणी, सर्व VM-संबंधित ऑपरेशन्सची क्लाउड डॅशबोर्ड क्रिएशनचा अनुभव असावा. SSL सर्टिफिकेट सेट करणे आणि इतर वेब सिक्युरिटी-संबंधित कामांचं ज्ञान असावं. तसेच GeM, SPARROW, e-Samiksha अशा सरकारी पोर्टल्स हाताळण्याचा अनुभव असावा.

Government Jobs: महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार; केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात ओपनिंग्स; इथे करा अर्ज

कन्सल्टंट (नेटवर्क मॅनेजमेंट)

उमेदवारांना नेटवर्क मॅनेजमेंट आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 3-5 वर्षांचा अनुभव असावा आणि नेटवर्क आणि सिक्युरिटी प्रॉडक्ट्समध्ये हँड-ऑन आणि कोअर अनुभव असावा. सिस्को सारख्या विविध नेटवर्क प्रॉडक्टची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी उमेदवारांना एक्सपोजर असणं आवश्यक आहे. उमेदवारांना विविध प्रोटोकॉल, इन्ट्रुशन प्रिव्हेंशन सिस्टिम, वायरलेस टेक्नॉलॉजी, अँटिव्हायरस, फायरवॉल्सची माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे स्ँटडर्ड नेटवर्क डिझाइन्स, स्टोरेज, कॉम्प्युट बेस्ट प्रॅक्टिसेस व सोल्युशन स्कील्स असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे उत्कृष्ट लेखन आणि संवाद कौशल्ये असणं आवश्यक आहे.

कन्सल्टंट (सायबर सिक्युरिटी)

उमेदवारांना सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील 3-5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांना इन्फॉर्मेशन/सायबर सिक्युरिटी आणि रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रातील अनुभवासह IT चा अनुभव असावा. तसेच सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मेथडॉलॉजी व सायबर सुरक्षितते-संबंधी उपक्रम राबवण्याचा अनुभव असावा. उमेदवारांना रेड टीम एक्सरसाइज आणि पेनिट्रेशन टेस्टिंग असेसमेंटसह इन्फ्रास्ट्रक्चर/नेटवर्क सिक्युरिटी असेसमेंट आयोजित करण्याचा अनुभव असावा. Cert-In/NIC मधून प्रशिक्षण घेतलेले असावे. उमेदवारांना सरकारी क्षेत्रातील अनुभव असावा, तसेच वेबसाइटशी संबंधित सिक्युरिटी समस्या सोडवण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

सीनिअर कन्सल्टंटपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 50 पेक्षा कमी असावे आणि कन्सल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 पेक्षा कमी असावे.

उमेदवारांना किती पगार मिळेल -

सीनिअर कन्सल्टंट

निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 125000-175000 पगार मिळेल.

कन्सल्टंट

निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 75000-100000 पगार मिळेल.

अर्ज कसा करायचा

अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर नीट भरलेला अर्ज पाठवायचा आहे. नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवस आधी अर्ज पत्त्यावर पोहोचला पाहिजे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Shri Abhishek Biswas, Under Secretary (Admn.), National Disaster Management Authority, NDMA Bhawan, A-1, Safdarjung Enclave, New Delhi-110029.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams