मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NDA Recruitment 2021: महिलांच्या NDA प्रवेशासाठी काय असतील शारीरिक फिटनेसचे निकष? लवकरच जाहीर होणार

NDA Recruitment 2021: महिलांच्या NDA प्रवेशासाठी काय असतील शारीरिक फिटनेसचे निकष? लवकरच जाहीर होणार

आता महिलांसाठी शारीरिक फिटनेसचे निकष (Physical Fitness Criterion for NDA women Process) काय असतील याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता महिलांसाठी शारीरिक फिटनेसचे निकष (Physical Fitness Criterion for NDA women Process) काय असतील याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता महिलांसाठी शारीरिक फिटनेसचे निकष (Physical Fitness Criterion for NDA women Process) काय असतील याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतर या सत्रापासून महिलांना नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता महिलांनी यासाठी अर्ज (NDA women Admissions) केले आहेत. महिलांसाठी आता ही अर्ज प्रक्रिया (National Defence  Academy Application process) संपली आहे. सैन्यात महिलांना आणि पुरुषांना सामान संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मात्र आता महिलांसाठी शारीरिक फिटनेसचे निकष (Physical Fitness Criterion for NDA women Process) काय असतील याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते हे निकष लवकरच जाहीर (Physical Fitness Criterion for NDA women Admission) केले जाणार आहेत.

UPSC NDA Exam आधीच नियोजित वेळेच्या मागे आहे आणि आयोग परीक्षा पुढे ढकलणार नाही. त्यामुळे तारखा पुढे ढकलल्या जाऊ नयेत म्हणून लवकरच यूपीएससी महिलांच्या फिटनेस निकषांबाबत माहिती जाहीर करेल असा अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

UPSC नं जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एनडीएची परीक्षा 14 नोव्हेंबरला होणार आहे. आयोगाने महिला उमेदवारांसाठी जागांची संख्या आणि पात्रता निकष जाहीर केले नाहीत आणि यामुळे एनडीए परीक्षा 2021 पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचा- UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगाद्वारे तब्बल 56 जागांसाठी होणार भरती

UPSC NDA Exam II 2021 राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (National Defence Academy) 370 आणि नौदल अकादमीमध्ये (National Naval Academy) 30 अशा एकूण 400 पदांसाठी नियुक्त करणार आहे. विद्यमान रिक्त पदांमध्ये महिला उमेदवारांच्या रिक्त जागा जोडल्या जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं की महिला उमेदवारांसाठी प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाचे वेगळे पैलू तयार करण्याची गरज आहे. ज्यात मैदानी प्रशिक्षण, कवायती, पोहणे, खेळ इत्यादींचा समावेश करण्याची गरज आहे. तसंच महिला उमेदवारांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम, योग्य विश्लेषण आणि तज्ञांचं मत आवश्यक आहे असंही केंद्र सरकारनं म्हंटलं आहे. त्यामुळे लवकरच महिलांसाठी हे निकष जाहीर करण्यात येतील अशी आशा आहे.

महिलांना अडचणींना द्यावं लागेल तोंड

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड अनेक कडक प्रक्रिया (Selection process for NDA) केल्यानंतर केली जाते. मग उमेदवारांचं प्रशिक्षण देखील अत्यंत कठीण पद्धतीनं घेतलं जातं. अशा परिस्थितीत इतक्या कमी वेळात महिला उमेदवारांच्या वैद्यकीय फिटनेस आणि इतर मानकांबाबत नवीन नियम बनवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. महिला उमेदवार या सर्व अडचणींचा सामना करून पुढे जातील. पुरुषांपेक्षा महिला कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करतील यात काडीमात्र शंका नाही.

First published: