मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 47 जागांसाठी होणार भरती; या लिंकवर करा अर्ज

Job Alert: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 47 जागांसाठी होणार भरती; या लिंकवर करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट:  नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Thermal Power Corporation Limited) तब्बल 47 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NTPC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मेडिकल स्पेशलिस्ट आणि असिस्टंट ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल  मेडिसिन, बालरोग) (Medical Specialist)

असिस्टंट ऑफिसर फायनांस (Assistant Officer)

शैक्षणिक पात्रता

मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल  मेडिसिन, बालरोग) (Medical Specialist) -  MBBS आणि MD / DNB ची पदवी आवश्यक.

असिस्टंट ऑफिसर फायनांस (Assistant Officer) - CA / ICWA आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

हे वाचा - डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी

वयोमर्यादा

मेडिकल स्पेशलिस्ट (जनरल  मेडिसिन, बालरोग) (Medical Specialist) -  18 ते 37 वर्ष

असिस्टंट ऑफिसर फायनांस (Assistant Officer) - 18 ते 30 वर्ष

SC/STसाठी 05 वर्षांची सूट आणि OBCसाठी 03 वर्षांची सूट.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://open.ntpccareers.net/2021_med_sps/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs