Home /News /career /

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला चुकूनही 'हे' कपडे घालून जाऊ नका; NTA नं नियमावली केली जाहीर

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेला चुकूनही 'हे' कपडे घालून जाऊ नका; NTA नं नियमावली केली जाहीर

तुम्हीही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: वैद्यकीय शिक्षणाच्या (Medical srudies) अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी NEET PG आणि NEET UG परीक्षा अनुक्रमे येत्या 11 आणि 12 सप्टेंबर 2021 ला घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेशपत्र जारी (NEET PG UG Admit card) करण्यात येणार आहेत. NEET PG साठी प्रवेशपत्र आज जारी करण्यात आले आहेत. मात्र आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड (Dress code for NEET Exam) कसा असावा, सोबत काय आणावं काय अनु नये याबाबत नियमावली (Rules for NEET Exam 2021) जाहीर केली आहे.  तुम्हीही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. हे असणार काही महत्त्वाचे नियम   विद्यार्थिनी परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी परिधान करून येऊ शकणार नाहीत. तसंच कोणतीही मेटलची म्हणजे धातूची वस्तू घेऊन जाऊ शकणार नाही. यासाठी परीक्षा केंद्रांवर तपासणी होणार आहे. परीक्षा केंद्रांवर वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचणं महत्त्वाचं आहे. तसंच सोबत मास्क आणि ग्लोव्स घालून येणं अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांनी फुल स्लीव्ह शर्ट आणि मुलींनी  डिझायनर कपडे, फुलं, ब्रोचेस किंवा मोठी बटणं असलेले कपडे घालून येऊ नये असं सांगण्यात आलंय. तसंच हाय हिल्स सॅंडल आणि मोठे खिसे असणारे पँट्स घालू नये असंही सांगण्यात आलं आहे. हे वाचा - IT सेक्टरमध्ये Work From Home संपणार? ही कंपनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवणार परीक्षा केंद्रावर दागिने, कानातले, नाकाची अंगठी, अंगठ्या, पेंडेंट, गळ्यातील हार, बांगड्या  यांसारखे दागिने घालून याल तर परवानगी देण्यात येणार नाही असंही नियमावलीमध्ये सांगण्यात आलं आहे. फुल ईएवजी हाफ शर्ट जिंव्हा टीशर्ट घालून येण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलच्या बाहेरच आपले शूज, चप्पल किंवा सँडल्स काढून ठेवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना सोबत सॅनेटाईझर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सोबत घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Entrance exam, Medical exams, Rules

    पुढील बातम्या