नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये होणार पदभरती; इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.

  • Share this:
    चेन्नई, 19 जुलै: नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये (National Instructional Media Institute recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कंसल्टंट्स (consultant) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार (Junior vocational consultant) - 240 पोस्ट तांत्रिक सहाय्य सल्लागार(Technical support consultant) - 48 पोस्ट आयटी समर्थन सल्लागार (IT support consultant) - 30 पोस्ट शैक्षणिक पात्रता कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार (Junior vocational consultant) - संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम तांत्रिक सहाय्य सल्लागार(Technical support consultant) - अभियांत्रिकी पदवी / पदविका / बीबीए / एमबीए आयटी समर्थन सल्लागार (IT support consultant) - संगणक विज्ञान किंवा आयटीमध्ये बीई / बीटेक / एमटेक हे वाचा - मोठी संधी! मुंबई मेट्रोमध्ये इंजिनिअर्स पदावर होणार भरती; आजच करा अप्लाय इतका मिळणार पगार कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार (Junior vocational consultant) - 35,000/- प्रतिमहिना तांत्रिक सहाय्य सल्लागार(Technical support consultant) - 45,000/-प्रतिमहिना आयटी समर्थन सल्लागार (IT support consultant) - 45,000/- प्रतिमहिना अशी असेल निवड प्रक्रिया उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागेल. ती 120 गुणांची असेल. याशिवाय अनुभवावर गुणही दिले जातील. जास्तीत जास्त पाच वर्षांच्या अनुभवासाठी 20 गुण दिले जातील. कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार पदासाठी 100 गुणांची चाचणी असेल. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: