Home /News /career /

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती; 'या' पदांसाठी जागा रिक्त

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती; 'या' पदांसाठी जागा रिक्त

मुलाखतीची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.

    लातूर, 20 जुलै:  राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (National Health Mission Latur, Arogya Vibhag Latur) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-time Medical Officer) या पदासाठी हे भरती असणार आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती असणार आहे. अपात्र उमेदवारांनी या भरतीसाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-time Medical Officer) - एकूण जागा 06 शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MCI/MMC Council Registrar हे शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - सर्वात मोठी संधी! पॉवरग्रीडमध्ये तब्बल 1110 जागांसाठी होणार बंपर पदभरती इतका मिळणार पगार अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-time Medical Officer) - 30,000/-  रुपये प्रतिमहिना मुलाखतीचा पत्ता उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – 413512. मुलाखतीची तारीख - 27 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Latur

    पुढील बातम्या