नाशिक, 14 जुलै: नाशिक महानगरपालिकेत (Nashik MNC Recruitment 2021) विविध वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, ANM, एक्स-रे तंत्रज्ञ आणि ई तंत्रज्ञ या पदांसाठी भरती होणार आहे. तब्बल 346 जागांसाठी ही भरती (latest Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 ते 27 जुलै 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
फिजिशियन (Physician)
ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
हॉस्पिटल व्यवस्थापक (Hospital Manager)
कर्मचारी नर्स (Staff Nurse)
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
हे वाचा - मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांसाठी गरजेचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 2, 23, 26 आणि 27 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Nashik