Home /News /career /

तुम्ही कोण आहात हे एक परीक्षा ठरवू शकत नाही; CBSE निकालानंतर विद्यार्थ्यांना मोदींचा मोलाचा सल्ला

तुम्ही कोण आहात हे एक परीक्षा ठरवू शकत नाही; CBSE निकालानंतर विद्यार्थ्यांना मोदींचा मोलाचा सल्ला

आज सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून उद्या महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल समोर येणार आहे. News18 लोकमतवर हा निकाल पाहता येणार आहे

  नवी दिल्ली, 15 जुलै : आज CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र ज्यांना या परीक्षेत यश मिळालं नाही त्यांना दु:खी होण्याचं कारण नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये मोदी म्हणातात – जे विद्यार्थी त्यांच्या CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी च्या निकालाने समाधानी नाहीत, त्यांना मी सांगू इच्छितो की एक परीक्षा तुम्ही कोण आहात हे सिद्ध करू शकत नाही. तुमच्यातील प्रत्येक विद्यार्थी विविध गुणांनी संपन्न आहे. तुम्ही तुमचं मनमोकळ जगा. कधीही आशा गमावू देऊ नका, नेहमीच भविष्याचा वेध घ्या..तुम्ही खूप चांगलं कराल.
  आज सीबीएसई बोर्डाचा 12 वी निकाल समोर आला. यामध्ये अनेक जणं चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले, तर अनेकांना आपल्या मनाप्रमाणे मार्क मिळाले नसतील. मात्र निराश होऊ नका. उद्याही महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल समोर येणार आहे. तुम्ही हा निकाल खाली दिलेल्या लिंकवरही पाहू शकता.
  हे वाचा-अबब! जुळ्या बहिणींचे 12 वीचे गुणही Same to Same; कुटुंबीयही झाले चाट पण या मार्कातून तुमचा विश्वास ढळू देऊ नका. हे मार्क तुमचं भवितव्य ठरवत नाही. त्यामुळे निराशा झटका आणि कामाला लागा. उद्या महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर  निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Narendra modi

  पुढील बातम्या