• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • 'नाबार्ड'मध्ये तब्बल 86 रिक्त जागांसाठी पदभरती; बघा महाराष्ट्रात किती पदं रिक्त

'नाबार्ड'मध्ये तब्बल 86 रिक्त जागांसाठी पदभरती; बघा महाराष्ट्रात किती पदं रिक्त

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2021 आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : NABCONS (नाबार्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस) (NABARD Consultancy Services) इथे विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. देशातील विचिध राज्यांच्या एकूण 86 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2021 आहे. यात महाराष्ट्राला (Maharashtra Jobs) एकूण पाच जागा देण्यात आल्या आहेत. या जागांसाठी पदभरती वरिष्ठ स्तरीय सल्लागार (Senior Level Consultants) मध्यम पातळीचे सल्लागार (Middle level Consultants) गणनेते (Enumerators) हे वाचा - पुण्याची मराठी मुलगी झाली अब्जाधीश; स्वकर्तृत्वार अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल शैक्षणिक पात्रता वरिष्ठ स्तरीय सल्लागार - कृषी आणि संबंधित विषयांत पदवीधर उमेदवार. पदव्युत्तर उमेदवार शेती, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान. मध्यम पातळीचे सल्लागार - कृषी आणि संबंधित विषयांत पदवीधर उमेदवार. पदव्युत्तर उमेदवार शेती, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान. गणनेते - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2021 पात्र उमेदवारांना www.nabcons.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: