मुंबई, 10 जानेवारी: वाराणसी ते दिब्रुगढ असा तब्बल जगातील सर्वात लांब आणि 27 नद्यांची सफर याशिवाय वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देत ही ही क्रूज जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या क्रूजचे फोटो आणि सफर विलक्षण आकर्षक असणार आहे. तसंच या क्रुझमुळे कितीतरी बेरोजगारांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बनदा सोनोवाल यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.
गुवाहाटी येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी वाराणसी येथे सर्वात लांब नदी क्रूझच्या प्रवासाचे उद्घाटन करतील. क्रूझ वाराणसी ते दिब्रुगडपर्यंत 3200 किलोमीटरच्या 28 नदी प्रणालींमधून प्रवास करेल. सोनोवाल म्हणाले की, ही रिव्हर क्रूझ मोदींच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ते म्हणाले की, अभ्यागत ते ज्या ठिकाणी जातील तेथील संस्कृती आणि वारसा जाणून घेऊ शकतात.
सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा
रिव्हर क्रूझमुळे स्थानिक लोकांसाठी येत्या काळात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत तसेच नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या शेजारील देशांना त्याचा फायदा होणार आहे. रिव्हर क्रूझ सुरू झाल्यानंतर क्रूझ उद्योग मोठ्या प्रमाणात भरभराटीला येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसंच एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात 36 स्विस नागरिक प्रवास करतील. या प्रवासासाठी एका प्रवाशाला दररोज 300 अमेरिकन डॉलर मोजावे लागतील.
पंतप्रधान 13 जानेवारी रोजी गुवाहाटी येथील पांडू येथे वाराणसी येथून जहाज दुरुस्ती सुविधांचे उद्घाटन करतील जे ईशान्य विभागातील क्रूझ ऑपरेटरना मदत करतील. गंगा विलास या क्रूजची सफर एक विलक्षण अनुभव असणार आहे. पर्यटन वाढवण्यासाठी खास ही क्रूज तयार करण्यात आली आहे. 3,200 किलोमीटर ही क्रूज प्रवास करणार आहे. एकूण 50 दिवस हा प्रवास असेल. यामध्ये 27 नद्यांसोबतच इतर काही खास पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे.
या क्रूझवर आचारीपशु ते हाऊस किपींग स्टाफपर्यंत सर्व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसंच तरुणांसाठी ,येत्या काळातही अशाच काही क्रूझ सुरु करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams