पाहा PHOTO : गुगलची नोकरी सोडून त्याने विकले सामोसे, आज झाला 50 लाखांचा मालक

'मी अशी व्यक्ती आहे की ज्याने सामोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली', असं मुनाफ कपाडियाने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे. त्याच्या 'द बोहरी किचन' मधले सामोसे देशभरात प्रसिद्ध आहेत.

  • Share this:

जर कोणी गुगलची चांगली नोकरी सोडून सामोसे विकायला सुरुवात केली तर त्याला लोकं मूर्खात काढतील पण तोच माणूस जर वर्षाला 50 लाख रुपये कमवत असेल तर कदाचित लोकांचं मत बदलेल. ही सक्सेस स्टोरी आहे 28 वर्षांच्या मुनाफ कपाडियाची.

मुनाफ कपाडियाने त्याच्या फेसबुल प्रोफाइलमध्ये लिहिलं आहे, मी अशी व्यक्ती आहे की ज्याने सामोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. मुनाफचे सामोसे फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि बॉलिवूडमध्ये खास लोकप्रिय आहेत. मुनाफने एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरी करून मग तो परदेशात गेला. तिथे त्याला गुगलची नोकरी मिळाली. पण ही नोकरी करताना मुनाफला वाटतं की तो याहीपेक्षा चांगलं काम करू शकतो. मग काय, तो भारतात आला.

ही आयडिया सुचल्यावर मुनाफने कंपनी सुरू केली. सध्या तो भारतात द बोहरी किचन नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो. मुनाफ सांगतो, त्याची आई नफीसा टीव्हीची शौकीन आहे. त्यामुळे आई तासनतास टीव्हीसमोर असायची. तिला फूड शो पाहणंही आवडायचं. त्यामुळे ती चांगली कुक होती. मुनाफला वाटलं, आपल्या आईकडून टिप्स घेऊन फूड चेन सुरू करावी. मग त्याने रेस्टॉरंट उघडलं आणि आईच्या हातचं जेवण सगळ्यांना खाऊ घातलं. सगळ्यांनाच या हॉटेलमधलं खाणं आवडलं. त्यामुळे मुनाफला प्रेरणा मिळाली.

मुनाफ कपाडियाचं 'द बोहरी किचन' फक्त मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या रेस्टॉरंटमधला मटन सामोसा ही त्यांची खासियत आहे. नर्गिसी कबाब, डब्बा गोश्त, करी चावला या त्यांच्या डिशेसही प्रसिद्ध आहेत.

गेल्या दोन वर्षांत त्याच्या रेस्टॉरंटचा टर्नओव्हर 50 लाख रुपयांवर गेलाय. त्याच्या या रेस्टॉरंटला सेलिब्रेटींनीही वाखाणलं आहे. आशुतोष गोवारीकर, फराह खान यांच्यासारख्या व्यक्तींनी त्याच्या रेस्टॉरंटचं कौतुक केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या