मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Mumbai University UG Admissions 2021: आज येणार दुसरी मेरीट लिस्ट, इथे वाचा कशी पाहता येईल ही गुणवत्ता यादी

Mumbai University UG Admissions 2021: आज येणार दुसरी मेरीट लिस्ट, इथे वाचा कशी पाहता येईल ही गुणवत्ता यादी

Representative Image

Representative Image

Mumbai University UG Admissions 2021 Second Merit List: विविध शाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी मुंबई विद्यापीठाकडून बुधवारी, 25 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट: विविध शाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या (Under Graduate Admissions) प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University UG admissions 2021 Second merit list)  बुधवारी, 25 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परीक्षा वेळापत्रकात (Exam Schedule) दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजल्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यानंतर उद्यापासून, म्हणजेच 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत  ऑनलाइन पडताळणी (Online Verification) केली जाईल आणि ऑनलाइन फी (Online Fee) स्वीकारली जाणार आहे. 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतचा कालावधी यासाठी देण्यात आला आहे.

आज प्रसिद्ध होणारी दुसरी गुणवत्ता यादी mu.ac.in या मुंबई विद्यापीठाच्या वेबसाइटवर, तसंच विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व संबंधित कॉलेजेसच्या वेबसाइट्सवरही पाहता येणार आहे.

हे वाचा-श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरी

पहिली गुणवत्ता यादी 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यात अनेक कॉलेजेसमध्ये कट-ऑफने (Mumbai University Cut-Off) 98 टक्क्यांची पातळी गाठली होती. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस असणार आहे. सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये HSC Arts चा कट ऑफ 98 टक्के नोंदवला गेला. तसंच, हिंदुजा कॉलेजमध्ये कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्ससाठीचा BMS कट-ऑफ अनुक्रमे 93 टक्के, 85.50 टक्के आणि 83.67 टक्के एवढा नोंदवला गेला.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतून संधी मिळाली नसेल, त्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजेसमध्ये पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी दुसरी गुणवत्ता यादी तपासावी. बारावीच्या परीक्षेत यंदा अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असल्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफची पातळी जास्तच असेल, असा अंदाज आहे.  ज्या विद्यार्थ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत प्री-एन्रोलमेंट फॉर्म्ससह (Pre-Enrollment Forms) अॅडमिशन फॉर्म्स (Admission Form) सादर केले आहेत, ते या अॅडमिशन प्रक्रियेत पुढे जाण्यास पात्र असतील, असं विद्यापीठातर्फे कळवण्यात आलं आहे.

हे वाचा-Kolhapur Job Alert: शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी भरती

गुणवत्ता यादी कशी पाहता येईल?

- मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

- वेबसाइटच्या होम पेजवर Mumbai University Admission 2021 अशी लिंक उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करावं.

- त्यानंतर स्वतःचे लॉगिन डिटेल्स टाकून submit बटणावर क्लिक करावं.

- त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसू लागेल.

First published:

Tags: Mumbai, Students