मुंबई, 24 जानेवारी: मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. दिनांक 30 जानेवारीला होणाऱ्या तब्बल 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अपडेट विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात लवकरच महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काही पेक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र या परीक्षा आता कधी होणार याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा या 30 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलून 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या एकूण 30 परीक्षांमध्ये पुढील विषयांचे पेपर्स होणं होते.
JEE Mains 2023: कोणत्याही अडचणींशिवाय सेंटरवर प्रवेश हवाय ना? मग या गाईडलाईन्स एकदा वाचाच
Law, अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, Commerce आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र या सर्व परीक्षा आता 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.
कोणत्या विषयाच्या कुठल्या परीक्षा ढकलल्या पुढे
विषय | सेमिस्टर |
ह्युमॅनिटीज | एमए सेम III, एमए सेम II, सेम IV |
लॉ | एलएलएम - सेम III, बीबीए -एलएलबी सेम III |
इंजिनिअरिंग | एसई सेम III |
सायन्स | M.Sc Sem IV, M.Sc भाग II. |
कॉमर्स | M.Com भाग II |
एकूणच काय तर विद्यार्थ्यांनी या बदलण्यात आलेल्या तारखांची नोंद घ्यावी असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुले तुमचीही परीक्षा यामध्ये असेल तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अजून थोडा वेळ मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Exam, Mumbai