Mumbai University Admissions 2020: मुंबई विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या

Mumbai University Admissions 2020: मुंबई विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या

दुसरी गुणवत्ता यादी 11 ऑगस्टला जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : दहावी बारावीच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाकडून आज पहिली पदवीपूर्व (undergraduate courses) आणि पदवी अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी (cutoff list) मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in. या अधिकृत वेबसाईटवर गुणवत्ता यादी पाहू शकणार आहेत.

दुसरी गुणवत्ता यादी 11 ऑगस्टला जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी 17 ऑगस्टला जाहीर करण्यात येईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन आणि कागदपत्र दोन्ही प्रक्रिया 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान करायची आहे.

गुणवत्ता यादी 4 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार होती मात्र काही कारणांमुळे त्यात बदल करण्यात आला असून आज जाहीर करण्यात आली आहे.

हे वाचा-शेतकऱ्याचा पोऱ्या तो! ना क्लास, ना पैसा; 5 वर्ष लढला पण आता IPS झाला

गुणवत्ता यादी कशी पाहायची आणि कुठे पाहायची जाणून घ्या

mu.ac.in या वेबसाईटवर आपण गुणवत्ता यादी पाहू शकणार आहात. तिथे लॉगइन केल्यावर आपल्याला अनाऊंसमेंट मध्ये पाहता येईल. याशिवाय विद्यार्थांना जर प्रवेश प्रक्रियेत अडचण येत असल्यास 020-66834821 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

16 जुलैला बारावीचा निकाल लागला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया कोरोनामुळे ऑनलाइन घेणार येत आहे. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊ सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आतातरी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 1:58 PM IST

ताज्या बातम्या