मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

काय सांगता! कोंबडीच्या पंखांपासून त्यांनी सुरु केला बिझनेस; आज करताहेत कोट्यवधी रुपयांची कमाई

काय सांगता! कोंबडीच्या पंखांपासून त्यांनी सुरु केला बिझनेस; आज करताहेत कोट्यवधी रुपयांची कमाई

कोंबडीच्या पंखांपासून बिझिनेस

कोंबडीच्या पंखांपासून बिझिनेस

तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 सप्टेंबर: असं म्हणतात की नशीब बदलण्यासाठी एक लहानातील लहान गोष्टही पुरेशी असते. अगदी विमानापासुन तर रेती विकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे कमवता येतात. अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या बिझनेस आयडियाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आजपर्यंत तुम्ही चिकन किंवा कोंबडीचा व्यवसाय करताना लोकांना बघितले असेल. पण तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का की कोंबडीच्या पिसांपासूनही कपडे बनवता येतात... कदाचित नसेल पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशोगाथेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये काही लोकांनी कोंबडीच्या पिसांपासून कपडे बनवून करोडोंचा उद्योग उभारला आहे.

मोठी बातमी! आता 4 वर्षांच्या डिग्रीनंतर थेट करता येणार पीएचडी; रिसर्च पेपर्सचीही गरज नाही; UGC ची घोषणा

जयपूर येथील रहिवासी असलेल्या मुदिता आणि राधेश यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. दोघांनाही कॉलेजमध्ये ही कल्पना सुचली, त्यानंतर दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आणि करोडोंचा व्यवसाय केला. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल खूप जास्त आहे. या लोकांनी त्यांच्या कंपनीचे नाव मुदिता अँड राधेश प्रायव्हेट लिमिटेड ठेवले आहे. राधेश सांगतात की, त्यांनी हे काम 16,000 रुपयांपासून सुरू केले, पण आता त्यांची कंपनी करोडोंचा व्यवसाय करत आहे. गेल्या अडीच वर्षांत कंपनीने 7 कोटींचा व्यवसाय केला असून, सध्या उलाढालीचा विचार करता तो अडीच कोटींचा आहे.

8 वर्षे लागला वेळ

या दोघांना स्वतःचे फॅब्रिक बनवून ते तयार करण्यासाठी सुमारे 8 वर्षे लागली आहेत. त्यामागे त्यांनी अथक परिश्रम करून खूप संशोधन करून कचर्‍यापासून कापड तयार केले आहे.

परदेशात मोठी मागणी

मुदिता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिच्याकडे सध्या फारसे ग्राहक नाहीत कारण भारतातील लोक चिकन पिसांपासून बनवलेले फॅब्रिक वापरणे टाळतात, परंतु परदेशात त्याला खूप मागणी आहे. या फॅब्रिकपासून बनवलेली उत्पादने परदेशात वापरली जातात.

NEET UG परीक्षेत कमी मार्क्स आलेत तरी मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज; कसं ते वाचा 

राधेश आणि मुदिता सांगतात की, सध्या त्यांच्याकडे सुमारे बाराशे विणकर आहेत जे कोंबडीच्या पिसांपासून कापड बनवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर मुदिता यांना महिन्याला सुमारे 8000 ते 12000 रुपये दिले जातात. याशिवाय यावेळी बहुतांशी कामे मशिनवर हलवली जात असली तरी या दोघांना जोडून अधिकाधिक विणकरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

First published:

Tags: Business News, Career, Money, Success stories, Success story