मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी हॉल तिकीट जारी केले आहे. mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध पदांच्या भरतीसाठी MPSC राज्य सेवा प्राथमिक परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. MPSC राज्य सरकारमधील विविध पदांवर 161 रिक्त पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेणार आहे.
MPSC हॉल तिकीट 2022 कसे डाउनलोड करायचे?
>> अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in ला भेट द्या आणि 'लॉग इन' टॅबवर क्लिक करा.
>> नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
>> हॉल तिकीट लिंकवर क्लिक करा.
>> MPSC राज्यसेवा प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
>> डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
क्या बात है! राज्यातील 'ही' बँक देणार इंजिनिअर्सना जॉब्स; संधी सोडू नका; लिंकवर लगेच करा अप्लाय
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचं स्वरुप
>> एमपीएससी परीक्षेचे दोन्ही पेपर प्रत्येकी 200 गुणांचे असतील.
>> प्रत्येक पेपरचा कालावधी दोन तासांचा आहे.
>> प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
>> सर्व प्रश्न इंग्रजी आणि मराठीत असतील.
>> MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांना दोन्ही पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Mpsc examination