मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महाविकास आघाडीमध्ये MPSC मुद्द्यावरुन बिघाडी; मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी?

महाविकास आघाडीमध्ये MPSC मुद्द्यावरुन बिघाडी; मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी?

एमपीएससी परीक्षेसंदर्भात (MPSC Exam 2020) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

एमपीएससी परीक्षेसंदर्भात (MPSC Exam 2020) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

एमपीएससी परीक्षेसंदर्भात (MPSC Exam 2020) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

मुंबई, 12 मार्च: एमपीएससी परीक्षेसंदर्भात (MPSC Exam 2020) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी विनंती केली होती की एमपीएससी परीक्षा पुढे ढकलू नये. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही यांनी मागणी फेटाळत निर्णय घेतल्याने नाराजी वाढली आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, कॅबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार, प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, यासह एनसीपी आमदार रोहित पवार यांनी विनंती केली होती परिक्षा पुढे ढकलू नये. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन उघडपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण सीएम यांनी या सर्व नेत्यांच्या विनंतीस केराची टोपली दाखवल्याचं म्हटले जात आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेस सीएम ठाकरे फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे आणि यावरून नाराजी अधिक वाढल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र नसेल तरी इंजिनिअर होता येणार)

एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परस्पर घेतल्याचा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा होता. अर्थात त्यांच्या विभागाच्या सचिवांनी परस्पर ही परवानगी दिल्याचे समोर आलं. कॅबिनेट मंत्र्यांना याबाबत पूर्वकल्पना नसणं यावरून विरोधी पक्ष नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती- कोणत्याही परिस्थितीत नियोजित तारखेलाच एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी राज्य सरकार त्यांना सर्व सहकार्य करेल. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री परीक्षा योग्य वेळी घ्या असे म्हणतात आणि त्यातच खातं परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश देतं  त्यामुळे अशी दुहेरी भूमिका कशी काय? अशा स्वरूपाची टीका केली गेली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत नियोजित तारखेलाच परीक्षा घेण्याची भूमिका मांडली होती. त्यांना मुख्यमंत्री यांनी देखील सकारात्मक आश्वासन दिले होते, अशी माहिती मिळते आहे. पण निर्णय घेताना मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षेची तारीख आज (शुक्रवारी) जाहीर करण्याची भूमिका घेत पुढील आठ ते दहा दिवसात परीक्षा घेण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे नियोजित तारखेला (14 मार्च) परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray FB live) यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना MPSC च्या निर्णयाबद्दल मोठी घोषणा केली. येत्या 14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं. त्यांना आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, पुढच्या आठडाभरात परीक्षा निश्चित होईल.

आपली लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. परीक्षा यंत्रणा खूप मोठी आहे. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्याने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळ लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग परीक्षेदरम्यान होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेसाठी देण्याची सूचना मी केली आहे, असंही ते म्हणाले. यंत्रणेतल्या सर्वांची कोरोना चाचणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: BJP, Career, Education, Examination, Maharashtra, Mpsc examination, Uddhav thacakrey