मुंबई, 01 ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा (MPSC changed Exam Process of prelims & Mains Exams) करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे.
आता MPSC च्या फक्त दोनच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र या पूर्व परीक्षांच्या आधारावर निरनिराळ्या विभागांमध्ये आपल्या करू इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परिलश उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत. राजपत्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर अराजपत्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा या MCQ मध्ये असणार आहेत.
MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांच्या पद्धतीमध्ये होणार मोठे बदल
मात्र आता या नवीन पॅटर्नमुळे उमेदवारांच्या सरकारी नोकरीच्या संधी कमी होतील का अशी शंका उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षांमधील हा नवीन पॅटर्न उमेदवारांसाठी घातक असल्याचं म्हंटलं आहे. यामुळे उमेदवारांच्या संधी कमी होतील असंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
UPSC च्या धर्तीवर अखेर MPSC नं देखील आपल्या परीक्षा पद्धतीत 2023 पासून बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या नव्या पँटर्ननुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही यापुढे लेखी स्वरूपाची असणार आहे. तसंच वर्ग 1 आणि 2 साठी एकच पूर्वपरीक्षा असणार आहे तर अराजपर्ञित पदांच्या ब आणि क वर्गासाठी एकच पूर्व परीक्षा असणार आहे तर मुख्य परीक्षा या प्रवर्गानुसार स्वतंत्र असणार आहेत. दरम्यान, MPSC च्या बदलत्या परीक्षा पँटर्ननुसार विद्यार्थी वर्गाच्या संधी कमी होतील, असं निरिक्षण परिक्षार्थींनी नोंदवलंय कारण 2023 पासून चार पूर्व परिक्षांऐवजी 2 परीक्षा होणार आहेत. महेश घरबुडे या MPSC च्या विद्यार्थ्यानं व्हिडिओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे.
नव्या पॅटर्नमुळे MPSC मधील संधी कमी होतील का? विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना... pic.twitter.com/fxxtsxbdNZ
— News18Lokmat (@News18lokmat) August 1, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेबर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे असं MPSC नं स्पष्ट केलं आहे. सदर बदल 2023 मधील परीक्षांपासून लागु होतील अशीही माहिती MPSC नं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entrance Exams, Job, Jobs Exams, Mpsc examination