Home /News /career /

MPSC च्या मुख्य परीक्षेत मोठे बदल, अभ्यासक्रमही बदलणार

MPSC च्या मुख्य परीक्षेत मोठे बदल, अभ्यासक्रमही बदलणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC नं परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होतील.

    मुंबई, 25 जून : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC नं परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असेल. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होतील. लोकसेवा आयोगानं पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी करण्याचा निर्णय आयोगानं मागील महिन्यांत घेतला होता. या निर्णयाची अंंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येणार आहे. पूर्वसेवा परीक्षेतील पेपर क्रमांक 2 म्हणजेच सीसॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यावर विचार करण्यासाठी माजी  माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती आयोगानं नियुक्त केली होती.  या समितीच्या शिफारसीनुसार सी-सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगानं यापूर्वीच जाहीर केला आहे. मुख्य परीक्षेत काय बदल? नव्या नियमानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे मार्कांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 मार्कांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275गुण असतील. या पद्धतीनं एकूण गुण 2 हजार 25 मार्कांची ही परीक्षा असेल. त्याचबरोबर एकूण 24 वैकल्पिक विषयातून उमेदवारांना एक विषय निवडता येईल. या विषयांची यादी देखील आयोगानं जाहीर केली. दहावी-बारावीनंतर NDA ची तयारी करताय? 'इथं' घ्या अ‍ॅडमिशन, VIDEO पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याची घोषणा आयोगानं या पत्रकात केली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Exam, Mpsc examination

    पुढील बातम्या