वडिलांचं छत्र हरपलं पण आईची प्रेरणा घेऊन कर्णिकानं परीक्षेत मिळवलं अव्वल यश

वडिलांचं छत्र हरपलं पण आईची प्रेरणा घेऊन कर्णिकानं परीक्षेत मिळवलं अव्वल यश

कर्णिकाने मध्य प्रदेश बोर्डात 300 पैकी 300 मार्क मिळवले आहेत.

  • Share this:

भोपाळ, 06 जुलै: मध्य प्रदेश बोर्डाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निकालात भोपाळमधील रीमा विद्या मंदिर शाळेच्या कर्णिका मिश्रा हिने परीक्षेत अव्वल य़श मिळवलं आहे. कर्णिकाने केवळ आपल्या कुटुंबीय आणि शाळेचच नाही तर तिच्या गावाचंही नाव उज्जव केलं आहे. कर्णिका सहावीत असताना वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर तिचा सांभाळ आई आणि आजीनं केला. आईची प्रेरणा आणि जिद्द पाहून कर्णिकानंही अपार मेहनत घेतली आणि दहावीच्या परीक्षेत अव्वल यश खेचून आणलं.

कर्णिलाकाने पुढे MPPSC देऊन जनतेची सेवा कऱण्याचं स्वप्न असल्याचंही सांगितलं आहे. कर्णिकाच्या उज्ज्वल यश पाहून राज्यमंत्री विश्वास सारंग यांनी तिला पुढील शिक्षणाच्या कोचिंग क्लाससाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोडली नोकरी, IPS नीरज जादौन यांची संघर्षगाथा

कर्णिकाने मध्य प्रदेश बोर्डात 300 पैकी 300 मार्क मिळवले आहेत. या मेहनतीमागे आई-शिक्षकांचं श्रेय असल्याचंही कर्णिकानं म्हटलं आहे. दिवसभर कार्यालयात काम करून संध्याकाळी थकलेली असतानाही कर्णिकाच्या अभ्यासाची जबाबदारी आईनं घेतली होती. शाळेत सोडण्यापासून खाण्या-जेवणापर्यंत आणि अगदी परीक्षा संपेपर्यंत आईनं कठोर मेहनत घेतल्याचं कर्णिकानं सांगितलं. आईची दिवस-रात्र मेहनत आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेतून मी अभ्यास केला आणि हे यश मिळवू शकले असंही कर्णिका म्हणाली.

कर्णिकानं 90 टक्के लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला सुरुवात केली. शेवटच्या तीन महिन्यात रोज साधारण 7 ते 8 तास सलग अभ्यास केला. गणित सर्वात जास्त आवडणारा विषय होता. प्रत्येक विषयावर लक्ष दिलं आणि जे जमत नाही त्याचा सराव अधिक केला असंही कर्णिकानं सांगितलं.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 6, 2020, 7:57 AM IST

ताज्या बातम्या