मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'या' बांगडी विक्रेतीच्या मुलाने अशा पद्धतीनं क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; टॉपर होण्यासाठी वाचा Motivational Story

'या' बांगडी विक्रेतीच्या मुलाने अशा पद्धतीनं क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; टॉपर होण्यासाठी वाचा Motivational Story

टॉपर होण्यासाठी वाचा

टॉपर होण्यासाठी वाचा

"आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल," असं दानिश सांगतो.

मुंबई, 04 जून:  मनात जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर कितीही कठीण परिस्थिती अली तरी माणूस  शकत नाही. अशीच काहीशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुण तरुणींबद्दल (Inspiring success story of youth) आपण ऐकलं असेलच. आर्थिक अडचणींवर मात करत दानिश हुसैनने (Success Story Danish Hussain) झारखंड लोकसेवा आयोगाच्या (Jharkhand Public Service Commission) परीक्षेत 80 वा क्रमांक मिळवला आहे. दानिश हा झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील जाहुदी अन्सारी यांच्या निधनानंतर दानिशची आई झरिना खातून (Zarina Khatoon) बांगड्या विकून घर चालवते. परंतु, मुलांनी शिकावं, असं त्यांना वाटायचं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने झरिना खातून यांना मुलांचं संगोपन करण्यासाठी बांगड्या विकण्याचा व्यवसाय करावा लागला. डोक्यावर टोपली ठेवून त्या रस्त्यावरून गावोगावी, गल्लीबोळात बांगड्या विकण्यासाठी फिरायच्या. या बांगड्या विकूनच त्यांनी मुलाला शिकवलं. "आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल," असं दानिश सांगतो. आशियातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये सौदी अरेबियानंतर भारताचा नंबर, बघा लिस्ट
दानिशने श्रमिक विद्यालय टोपा पिंद्रा (Shramik Vidyalaya Topa Pindra) येथून 2013 मध्ये 10वीची परीक्षा 73 टक्क्यांसह आणि मार्कहम कॉलेज हजारीबागमधून (Markham College Hazaribagh) 12वीची परीक्षा 76 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण केली. 2019 मध्ये दानिशची रेल्वेत नोकरीसाठी (Railway Job) निवड झाली होती; पण त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्याने रेल्वेची नोकरी स्वीकारली नाही आणि हजारीबागमध्ये राहून जेपीएससीची तयारी करू लागला. आपल्या मेहनतीमुळे आणि आवडीमुळे दानिशने जेपीएससी परीक्षेत यश मिळवून नावलौकिक मिळवलंय. दानिश त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला तसंच त्याच्या शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांना देतो. दानिशच्या यशाबद्दल त्याची आई झरिना खातून म्हणाल्या, "त्याने माझी सगळी स्वप्नं पूर्ण केली आहेत. आम्हा सर्वांना दानिशचा अभिमान आहे. दानिशने मिळवलेलं यश हे त्याचे कठोर परिश्रम (Hard work), चिकाटी आणि संघर्षाचं फळ आहे."
दरम्यान, अलीकडेच UPSC CSE 2021 चा निकालही जाहीर झाला आहे. देशात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या शासकीय परीक्षेत पहिल्या तीन जागा मुलींनी पटकवल्या आहेत. AIR 308 मिळवणाऱ्या अरुणाने पाच अयशस्वी प्रयत्नांनंतर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. ती कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील असून, अरुणाच्या वडिलांनी 2009 मध्ये आपल्या पाच मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली होती. अरुणा त्या वेळी इंजिनीअरिंग करत होती. आता मात्र तिने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत नावलौकिक कमवलाय.
First published:

Tags: Success, Success stories

पुढील बातम्या