मराठी बातम्या /बातम्या /करिअर /खूशखबर ! जुलैमध्ये वाढलं नोकऱ्यांचं प्रमाण, कोरोना काळातील सर्वाधिक vacancies

खूशखबर ! जुलैमध्ये वाढलं नोकऱ्यांचं प्रमाण, कोरोना काळातील सर्वाधिक vacancies

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of corona) रसातळाला गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of corona) रसातळाला गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of corona) रसातळाला गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे.

मुंबई, 6 ऑगस्ट : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of corona) रसातळाला गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे. देशातील नोकऱ्यांच्या जाहीरातींमध्ये (Employment ads) वाढ झाली असून जूनच्या तुलनेत जुलै (July) महिन्यातील नोकरीसाठीच्या जाहीराती 11 टक्के अधिक असल्याचा दावा नौकरी जॉबस्पिक्स इंडेक्समध्ये करण्यात आला आहे.

काय आहे रिपोर्ट?

नौकरी जॉबस्पिक्सच्या रिपोर्टनुसार जून महिन्यात नोकरीच्या 2359 जाहीराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या. तर जुलैमध्ये ही संख्या 2625 वर पोहोचली. कोरोना काळातील जाहीरातींचं हे सर्वाधिक प्रमाण आहे. भारतीय बाजारात तेजी येत असल्याचं हे लक्षण असून सलग दुसऱ्या महिन्यात नोकऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मे महिन्यात नोकऱ्यांची संख्या कमी झाली होती. मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत 15 टक्के अधिक नोकऱ्यांच्या जाहीराती निघाल्या. तर त्यानंतर जुलै महिन्यातदेखील 11 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 18 टक्के वाढ झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. तर मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात 11 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. लॉकडाऊचा सर्वात कमी फटका आयटी उद्योगाला बसला आहे. आता या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ लागल्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

हे वाचा - IIT मधले 63 टक्के ड्रॉपआउट्स आरक्षित श्रेणीतले; सरकारने संसदेत दिलं उत्तर

या क्षेत्रातही वाढतायत रोजगार

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन, टूरिझम यासारख्या क्षेत्रात पुन्हा एकदा नोकऱ्यांच्या जाहीराती यायला सुरुवात झाली असून कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे बाजार खुले होत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Jobs, Lockdown