मराठी बातम्या /बातम्या /करिअर /दुर्दैवी! देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर; ASER च्या रिपोर्टमध्ये उघड

दुर्दैवी! देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर; ASER च्या रिपोर्टमध्ये उघड

देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत (Students in Government schools) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत (Students in Government schools) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत (Students in Government schools) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 02 डिसेंबर: कोरोनामुळे जशी देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे तसंच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा (school education) प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेषतः सरकारी शाळांमध्ये (Government schools in India) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक अडचणी (Problems in Online education) येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत (Students in Government schools) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 57.5 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात पालकांचा पाठिंबा नसतो अशी माहिती एका रिपोर्टमधून (ASER Report 2021) समोर आली आहे.

16 व्या Annual Status of Education Report (ASER) 2021 मध्ये दिसून आलं आहे. अभ्यासात असं नमूद केलं आहे की सरकारी शाळांमधील केवळ 42.5% मुलांकडे आणि त्यांच्या अभ्यासाकडे पालकांकडून अपेक्षित लक्ष दिलं जात. तर खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी हीच टक्केवारी 72.5% आहे.

शिक्षण शुल्कात झाली वाढ

विशेष म्हणजे 9वी किंवा त्यापुढील वर्गात मुलांच्या पाठिंब्यामध्ये सर्वात मोठी घट झाल्याचं लक्षात आल आहे.. ASER अहवालात असं दिसून आलं आहे की देशभरात शिक्षण शुल्कात वाढ झाली आहे आणि झारखंड त्याला अपवाद नाही. केवळ केरळमध्येच शिक्षण शुल्कात वाढ केलेली नाही. सरकारी तसेच खाजगी शाळांमधील सर्व वर्गांच्या शिक्षण शुल्कातही वाढ झाली आहे.

पालकांची परिस्थिती महत्त्वाची

कमी शिकलेल्या पालकांच्या मुलांचं ट्यूशन घेण्याचं प्रमाण 12.6 टक्क्यांनी वाढलं आहे, तर केवळ 7.2 टक्के मुलांच्या पालकांनी त्यांना ट्युशन दिली आहे. यावरून हेच लक्षात येते की कमी शिकलेले पालक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत.

मोठी बातमी! कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क होणार माफ

असा तयार करण्यात आला रिपोर्ट

ASER 2021 अहवाल टेलिफोनिक सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आला होता, जो 25 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 581 जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात आयोजित करण्यात आला होता. हे सर्वेक्षण सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आणि 17,184 गावांमधील तब्बल 76,706 घरे, 7,299 शाळांचा समावेश करण्यात आला.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल

2020 मध्ये महामारी सुरू झाल्यापासून खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली होती, मात्र 2020 आणि 2021 दरम्यान, शाळांपैकी संख्या स्थिर राहिली आहे, खाजगी शाळांची नोंदणी कमी होत चालली आहे आणि अहवालानुसार, सर्व वयोगटातील सरकारी शाळांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Career, Education, Government, School