पुण्यातल्या पोलीस भरतीसाठी अर्जांचा पूर, तृतीयपंथीयही परीक्षेसाठी सज्ज!पुणे, 4 जानेवारी : पुणे शहर पोलीस दलातील 720 शिपाई पदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांची भरती होत आहे. या पुणे शहर पोलीस दलासाठी होणारी शिपाई पदाची भरती प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पोलीस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले आहेत. तर चालकपदासाठी 6 हजार 483 अर्ज आले आहेत. इतर जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्यात होत आहे.
एकाच वेळी लेखी परीक्षा -
अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज केले आहेत. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो. मात्र, मुंबई वगळता बहुतांश जिल्ह्यांतील पोलिस भरतीची लेखीपरीक्षा एकाच दिवशी होण्याचा अंदाज आहे.
तृतीयपंथीयांचे दहा अर्ज -
पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये आता महिला आणि पुरुषांसह ट्रान्सजेंडर्स यांनीही अर्ज केले आहे. पुण्यात तृतीयपंथीयांचे दहा अर्ज आले आहेत. याआधी फक्त पुरुष आणि महिलांनाच या पदांसाठी अर्ज करता येत होता. पण दोन तृतीयपंथीयांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर या संदर्भात मागच्या महिन्यात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीत मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने तृथीयपंथीयांच्या हिताचा निकाल दिला आहे.
हेही वाचा - IAS च्या तयारीसाठी मुलापासून दूर राहिल्या अनु कुमारी, नोकरीच्या 9 वर्षांनी दिली UPSC परीक्षा
राज्यात 18 लाख अर्ज -
राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune police