सरकारचा मोठा निर्णय, आता कोणतीच कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकत नाही

सरकारचा मोठा निर्णय, आता कोणतीच कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकत नाही

१०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेली कंपनी अचानक बंद करणं आता सोपं नसणार.

  • Share this:

नवी दिल्ली, ०५ जानेवारी २०१९- निवडणुकांच्या या काळात सरकारने कर्मचाऱ्यांना काढण्यावरुन आणि केव्हाही कंपनी बंद करण्याची मंजुरी देणाऱ्या बिलात बदल केले आहेत. आता पूर्वीप्रमाणे १०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

१०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेली कंपनी अचानक बंद करणं आता सोपं नसणार.

कर्मचाऱ्यांना काढून टाकताना सरकारची मंजुरी घेणं आवश्यक असेल.

श्रम कायद्यातून हा विवादास्पद क्लॉज हटवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

Closure, Layoff- Retrenchment क्लॉजमध्येही बदल करण्यात आला आहे.

कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशनअंतर्गत नवीन बदल करण्यात आले आहेत.

ड्राफ्ट बिलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १०० वरुन ३०० करण्यात आली होती.

यामुळे ३०० हून कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या स्वतःची मनमानी करत होते.

ट्रेड युनियनच्या दबावामुळे सरकारने नवीन सुधारणा करत जुने नियम मागे घेतले.

नव्या बदलांसहित तयार केलेलं ड्राफ्ट बिल सरकारने केंद्रात मंजुरीसाठी पाठवले आहे.

दोन ते तीन आठवड्यांच्या आत सरकार नवीन बिलाला मंजूरी देऊ शकते.

VIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका?

First published: January 5, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading