आता परदेशात PHD करण्याची संधी, मोदी सरकार करणार खर्च

आता परदेशात PHD करण्याची संधी, मोदी सरकार करणार खर्च

Modi Government - आता परदेशात पीएचडी पूर्ण करायचं स्वप्न पूर्ण होणार. जाणून घ्या याबद्दल

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : तुम्हाला परदेशात पीएचडी करायचीय? पण पैशाअभावी तुमचं स्वप्न अधुरं राहतंय. पण आता काळजी करू नका. मोदी सरकार तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. सरकार अशी एक योजना सुरू करतंय ज्या द्वारे विद्यार्थी परदेशात पीएचडी करू शकतात. या योजनेचं नाव आहे यंग अकॅडमिशन योजना. यात विद्यार्थी सरकारी खर्चानं परदेशात पीएचडी पूर्ण करू शकतात. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं ही योजना तयार केलीय.

सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की जगभरातल्या 200 रँकिंगवाल्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची संधी मिळेल. सरकार त्यांना पूर्ण मदत करेल. डिगरी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतात परतणं बंधनकारक आहे.

सोनं पुन्हा झालं महाग, चांदीही वधारली, 'हे' आहेत बुधवारचे दर

भारतीय उच्च शिक्षणात सुधारणा करण्यासाठी ही योजना आखलीय. याचा फायदा अनेक जण घेऊ शकतील.

स्वराज्यरक्षक संभाजी : कोंडाजींना जाळ्यात पकडण्यासाठी लवंगीचा 'असा' डाव

दरम्यान,पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजना स्किल इंडिया प्रोग्रॅममध्ये अनेक बदल होणार आहेत. ही योजना नव्यानं आकाराला येणार आहे. आता यात मोठ्या कंपन्यांबरोबर असंघटित आणि छोट्या संस्थांना फोकस केलं जाईल. स्किल इंडिया प्रोग्रॅममध्ये काय बदल होणार आहेत, याबद्दल बोलताना कौशल्य विभागाचे सेक्रेटरी डाॅ. केपी कृष्णन म्हणाले की, स्किल इंडिया मिशनमध्ये बदल केले जातील. यात असंघटित क्षेत्रावर फोकस ठेवला जाईल. सरकारचा 4 ते 6 हजार लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष आहे. यात गॅरेज, रेस्टाॅरंटसारख्या इंडस्ट्रीच्या हिशेबानं ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केला जाईल.

इंजिनीअरिंगचं स्वप्न बघणाऱ्या मुलींसाठी आता सरकारी स्कॉलरशिप; असा करा अर्ज

डाॅ. के पी कृष्णन यांनी सांगितलं, फ्रान्सच्या दसाॅबरोबर एअरोनाॅटिक्समध्ये प्रशिक्षणाचा करार केलाय. सुरुवातीला दसाॅचे टेक्निशियन ट्रेनिंग देतील. कौशल्य विकासासाठी एअरो फिटर, वेल्डर, कटरचं ट्रेनिंग दिलं जाईल.

नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

कोल्हापूर, सांगलीत महापुराचं कारण काय? पाहा हा VIDEO

Tags: career
First Published: Aug 7, 2019 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading