MMRC RECRUITMENT: मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख, या पदांसाठी आहे नोकरभरती

MMRC RECRUITMENT: मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख, या पदांसाठी आहे नोकरभरती

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन आणि इतर काही पदांसाठी नोकरभरती केली जात आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी: तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन या पदासाठी नोकरभरती केली जात आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही 31 जानेवारी 2021 अर्थात उद्यापर्यंत या पदासाठी अर्ज करू शकता.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये टेक्निशिअन, इंजीनिअर यासह काही पदांसाठी भरती सुरू आहे. याकरता उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ज्या उमेदरावांना याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल.

(हे वाचा-खूशखबर! HCL मध्ये मिळवा नोकरी, या तारखांना होणार व्हर्च्यूअल नोकरभरती)

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टेक्निशिअन पदासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थांकडून आयटीआय प्रमाणपत्र (ITI Certificate) असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्टेशन कंट्रोलर आणि ज्युनिअर इंजीनिअर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसंच सेक्शन इंजीनिअर पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये बीई किंवा बिटेक केलेलं असणे आवश्यक आहे.

(हे वाचा-मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव जवळपास 93 रुपये, तर याठिकाणी 101 रुपये आहे किंमत)

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये टेक्निशिअन, इंजीनिअर या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 28 असणे आवश्यक आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल, अन्य वर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 150 रुपये आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 29, 2021, 1:04 PM IST

ताज्या बातम्या