मीरा-भाईंदर, 26 जुलै: मीरा भाईंदर महानगरपालिकेत (Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2021) विविध जागांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. थेट मुलखाती घेऊन निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 03 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी अर्ज
औषधोपचार पर्यवेक्षक (Senior Drug Supervisor)
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (Tuberculosis Health Worker)
शैक्षणिक पात्रता
औषधोपचार पर्यवेक्षक (Senior Drug Supervisor) - कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी टायपिंग आवश्यक
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (Tuberculosis Health Worker) - सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक.
हे वाचा - Army Recruitment: ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट कामठी इथे नोकरीची संधी;
मुलाखतीचा पत्ता
मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प)
मुलाखतीची तारीख - 03 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job