Home /News /career /

Success Story: अवघ्या 11 वयात चालू केला लिंबूपाणी विकण्याचा व्यवसाय; आज झालीये कोट्यधीश

Success Story: अवघ्या 11 वयात चालू केला लिंबूपाणी विकण्याचा व्यवसाय; आज झालीये कोट्यधीश

आम्ही ज्या मुलीबद्दल सांगतोय तिने वयाच्या 11व्या वर्षी लिंबूपाणी (Lemonade) विकायला सुरुवात केली आणि आज ती कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

    मुंबई, 21 जून:   तुमच्याकडे चांगली बिझनेस आयडिया (Business Idea) असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. यासाठी तुमचं वय किती आहे, हे महत्त्वाचं नसतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उद्योजक मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने अगदी कमी वयात स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आता ती करोडपती बनली आहे. आम्ही ज्या मुलीबद्दल सांगतोय तिने वयाच्या 11व्या वर्षी लिंबूपाणी (Lemonade) विकायला सुरुवात केली आणि आज ती कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. मिकायला उल्मेर (Mikaila Ulmer) नावाची ही मुलगी आता 17 वर्षांची आहे आणि तिच्या यशस्वी बिझनेस मॉडेलमुळे ती एक बिझनेस आयकॉनदेखील बनली आहे. मिकायला उल्मेर 11 वर्षांची असताना तिने लिंबूपाणी बनवून घराबाहेर स्टॉल लावून विकायला सुरुवात केली होती. ते लिंबूपाणी लोकांना इतकं आवडलं, की आता मिकायलाने स्वतःचा लेमोनेड ब्रँड बनवला आहे. या संदर्भातलं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे. मिकायलाला ही कल्पना सूचली कशी? मिकायलाच्या बिझनेसबद्दल nypost.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की ती चार वर्षांची असताना तिला तिच्या आजीकडून रेसिपी बुक मिळालं होतं. त्यामध्ये 1940च्या काळातली फ्लॅक्ससीड लेमोनेडची (Flaxseed Lemonade) रेसिपी लिहिलेली होती. ही रेसिपी घरी बनवून पाहिल्यानंतर मिकायलाला ती विकण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने घरासमोर स्टॉल लावून हे लिंबूपाणी विकायला सुरुवात केली. पुढे 2016 मध्ये होल फूड्स मार्केट (Whole Foods Market) या सुपरमार्केट कंपनीने मिकायलाच्या ब्रँडशी करार केला. या डीलमध्ये मिकायलाला तब्बल 85 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली. त्यानंतर ती जगातली सर्वांत तरुण उद्योगपती म्हणून प्रसिद्ध झाली. ओरडणं, किंचाळणं इरिटेट होतं ना? पण ही महिला कलाकार याद्वारे कमवते भरमसाठ पैसे फ्लॅक्ससीड मिश्रित लिंबूपाण्याच्या कल्पनेनं मिकायलाला जगातली सर्वांत तरुण उद्योगपती बनवलं. होल फूड्स मार्केटशी करार केल्यानंतरही मिकायला तिचं उत्पादन सुधारण्यासाठी आणि त्यात नवनवीन फ्लेव्हर्स आणण्यासाठी अनेक प्रयोग करत राहते. तिने लिंबूपाण्यात साखरेऐवजी मधाचा वापर सुरू केला. त्यानंतर तिने मधमाशांच्या संवर्धनाचं कामही सुरू केलं. त्याला तिने Me & The Bees Lemonade असं नाव दिलं. या संदर्भातली माहिती मिकायलाच्या वेबसाइटवर दिलेली आहे. आजीच्या एका जुन्या रेसिपीने मिकायलाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं. ज्या वयात माध्यमिक शिक्षणही पूर्ण होत नाही, त्या वयात मिकायला जगातली सर्वात तरुण आणि प्रसिद्ध उद्योजक बनली आहे. मिकायलाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Success, Success story

    पुढील बातम्या