मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BREAKING: MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; इथे बघा तुमचा निकाल

BREAKING: MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; इथे बघा तुमचा निकाल

MHT CET च्या ऑफिशिअल वेबसाईटवर (Official website of MHT CET) जाहीर करण्यात आला आहे

MHT CET च्या ऑफिशिअल वेबसाईटवर (Official website of MHT CET) जाहीर करण्यात आला आहे

MHT CET च्या ऑफिशिअल वेबसाईटवर (Official website of MHT CET) जाहीर करण्यात आला आहे

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 ऑक्टोबर: उच्च शिक्षणासाठी तसंच बारावीनंतरच्या काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET या परीक्षेचा निकाल (MHT CET Result out) नुकताच आज संध्याकाळी जाहीर करण्यात आला आहे. आज संध्याकाळी सात वाजता हा निकाल (MHT CET Result website) MHT CET च्या ऑफिशिअल वेबसाईटवर (Official website of MHT CET) जाहीर करण्यात आला आहे. प्रोफेशनल कार्यक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी ही CET परीक्षा (mht cet 2021 exam) घेण्यात येते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र त्यानंतर ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार आता या परीक्षेचा निकाल लावण्यात (MHT CET Result 2021) आला आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात आली होती. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर काही महत्त्वाच्या अभयसक्रमांसाठी CET परीक्षा घेतली गेली होती. त्यामुळे या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची (How to check MHT CET result 2021) वाट बघत होते.

MHT CET 2021 समुपदेशन वेळापत्रक निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच प्रसिद्ध केले जाईल. विद्यार्थ्यांना पसंतीचे अभ्यासक्रम, कार्यक्रम आणि संस्थांमध्ये सामावून घेण्यासाठी समुपदेशनासाठी नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना समुपदेशन झाल्यानंतर लगेचच प्रोफेशनल आणि इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहेत.

अशा पद्धतीनं बघा तुमचा निकाल

सुरुवातीला mahacet.org वर अधिकृत वेबसाइटला भेट द्या

होमपेजवर दिसणार्‍या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

इथे तुमच्या सर्व रजिस्ट्रेशन डिटेल्स भरा.

यानंतर तुमचा MHT CET निकाल, स्कोअर कार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल, डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

First published:

Tags: महाराष्ट्र