मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BREAKING: MHADA परीक्षांबाबत सरकारची मोठी घोषणा; 'या' खासगी कंपनीला परीक्षा घेण्याचा दिला अधिकार

BREAKING: MHADA परीक्षांबाबत सरकारची मोठी घोषणा; 'या' खासगी कंपनीला परीक्षा घेण्याचा दिला अधिकार

एका खासगी कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी

एका खासगी कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी

एका खासगी कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 13 डिसेंबर: आरोग्य विभागा (Health Department) पाठोपाठ आता म्हाडाच्या (MHADA Exams) परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे. दहा दिवसांमध्ये समोर आलं आहे. राज्य सरकारकडून घेण्यातून येणाऱ्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सततच्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं मोठा नुकसान होत आहे. तसंच अशा परीक्षा घेण्यासाठी कोणीच पात्र नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी MHADA च्या भरती (MHADA Recruitment exam) परीक्षांसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. एका खासगी कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

आता MHADA ची परीक्षा TCS म्हणजेच TATA Consultancy Services या खासगी कंपनी अंतर्गत घेतली (MHADA exam TCS) जाणार आहे अशी घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे आता तरी या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

ही परीक्षा घेण्याचा संपूर्ण अधिकार TCS कडे देण्याचा निर्णय (TCS will take MHAFA exam) का घेतला गेला याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, पारदर्शकता या मागचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तातडीनं परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता TCS कडे हा अधिकार दिल्यानंतर पारदर्शकपणे या परीक्षा पार पडतील.

जे विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत करून आणि दिवस रात्रं अभ्यास करून परीक्षेची तयार करतात अशा मुलांना यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. गरीब घरच्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात न्याय मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि आम्ही तो हिरावून घेऊ शकत नाही. भावी पिढीचं आयुष्य घडवायचं असेल तर अशा महत्त्वाच्या परीक्षा TCS किंवा IBPS या संस्थांमार्फतच घेतल्या गेल्या पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गुन्हेगारांना धडा शिकवणार

ज्या दलालांना विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत अशा दलालांची नावं विद्यार्थ्यांनी समोर आणावीत. या पेपर फुटीच्या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणार. विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असंही मंत्री आव्हाड यांनी म्हंटलं आहे.

घोटाळ्यात शिक्षक सामील

औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय नंदू चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे हे त्यांच्या अकॅडमी मधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. त्यामुळे औरंगाबादच्या (Aurangabad) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमानं स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Exam, महाराष्ट्र