मुंबई, 31 मे: यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC आणि HSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आव्हान होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यासंबंधीची माहिती दिली होती. दहावी आणि बारावीचे स्टेट बोर्डाचे निकाल येत्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर करण्यात येतील अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाचे निकाल हे पुढील दहा दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
MH Board 12th Result: लवकरच जाहीर होणार बारावीचा निकाल; 'या' वेबसाईट्सवर दिसेल Result; बघा लिस्ट
बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी राज्य शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या एकूण माहितीवरून याच तारखांवर शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता आहे. .तसंच राज्यातील सर्व शहरांमध्ये शिक्षक जोमानं पेपर तपासणीला लागले होते. त्यात काही भागांमध्ये तांत्रिक अडचणीही आल्या. मात्र आता याचा सामना करून बोर्डानं पेपर तपासणी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे. मूल्यांकनाच्या एकूण सर्व प्रक्रियेनंतर बोर्डाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निकालांवर प्रवेश अवलंबून
दुसरीकडे आता अकरावीचे प्रवेशासाठी दुसऱ्या भागातील नोंदणी प्रक्रिया हि दहावीच्या निकालानंतर सुरु होणार आहे. तसंच आता पदवी प्रवेश प्रक्रिया ही CET बरोबरच बारावीच्या गुणांवरही अवलंबून असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल महत्त्वाचे असणार आहेत. हे निकाल जितक्या लवकर जाहीर करण्यात येतील तितकं विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेणं सोपी होणार आहे.
MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेसअसा चेक करा निकाल
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
"निकाल पहा" बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील वापरासाठी Save करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.