Home /News /career /

Breaking: MH CET परीक्षेच्या तारखांची घोषणा; 'या' कालावधीत होणार CET परीक्षा; लवकरच लागणार निकाल

Breaking: MH CET परीक्षेच्या तारखांची घोषणा; 'या' कालावधीत होणार CET परीक्षा; लवकरच लागणार निकाल

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

    मुंबई, 07 सप्टेंबर:  राज्यात बहुप्रतीक्षित अशा CET परीक्षेच्या तारखांची (MHT CET Exam dates) घोषणा आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. पदवी (Degree), पदव्युत्तर (PG) आणि प्रोफेशनल कार्यक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी ही CET परीक्षा (mht cet 2021 exam) घेण्यात येते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. मात्र आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये CET परीक्षा होणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच ही परीक्षा ऑनलाईन (online mht cet 2021) पद्धतीनं होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गेल्या वेळी राज्यात एकूण 198 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता ही परीक्षा तब्बल 226 केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यासाठी 50 हजार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनीं दिली आहे. हे वाचा - कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.  मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर काही महत्त्वाच्या अभयसक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे. ज्या दिवशी या मुंबईमध्ये परीक्षा असतील किंवा अन्य ठिकाणी परीक्षा असतील आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ज्या दिवशी या परीक्षा असतील त्या दिवसापुरता विद्यार्थ्यांना ट्रेनचा पास लोकल प्रवास करू द्यावा ही विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत असंही उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या