Home /News /career /

MH BOARD SSC RESULT: निकाल बघण्यात अडचणी येताहेत? टेन्शन नको; इथे थेट मिळवा तुमचा Result

MH BOARD SSC RESULT: निकाल बघण्यात अडचणी येताहेत? टेन्शन नको; इथे थेट मिळवा तुमचा Result

आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण जर तुम्ही अजूनही निकाल निकाल बघण्यात अडचणी येत असतील तर चिंता नको असा बघा निकाल.

  मुंबई, 17 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 17 जूनला 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण जर तुम्ही अजूनही निकाल निकाल बघण्यात अडचणी येत असतील तर चिंता नको असा बघा निकाल.
  अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. स्पेशल निकालाची वैशिष्ट्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40% लागला आहे. एकूण 66 विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे. राज्यातील शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन 2022 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2021 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 54,303 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 79.06% आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Exam Fever 2022, Exam result, State Board

  पुढील बातम्या