Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: पास होण्यासाठी नक्की किती गुण आवश्यक; काय आहेत बोर्डाचे नियम जाणून घ्या

MH BOARD 12TH RESULT: पास होण्यासाठी नक्की किती गुण आवश्यक; काय आहेत बोर्डाचे नियम जाणून घ्या

Maharashtra 12th Board Result 2022: या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. चला तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  मुंबई, 08 जून: यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा (Offline Board Exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. राज्यतील अनेक शहरांमध्ये बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षण दिल्यायनंतर परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच व्हाव्यात यावर विद्यार्थी ठाम होते. मात्र राज्य सरकारनं मागणी मान्य न करता ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतल्या. मात्र आता याच परीक्षांचे निकाल (Maharashtra state board result dates) जवळ आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. या परीक्षेचे निकाल उशिरा लागण्याची चिन्हं होती, मात्र आता बारावीच्या निकालाची जाहीर झाली आहे.
  आज म्हणजेच 08 जुन 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. चला तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. इतके गुण मिळवणं आवश्यक स्टेट बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी उपस्थित आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स मिळू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates कधीपासून सुरु होणार नोंदणी ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स मिळू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुरुवात 10 जूनपासून होणार आहे. जे विद्यार्थी कमी पडतील त्यांना हे फॉर्म भारत येणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

  पुढील बातम्या