Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: शेवटच्या क्षणी करू नका गडबड; तुमचा निकाल बघण्यासाठी इथे करा क्लिक

MH BOARD 12TH RESULT: शेवटच्या क्षणी करू नका गडबड; तुमचा निकाल बघण्यासाठी इथे करा क्लिक

आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन बघू शकणार आहात. पण अजूनही तुम्ही निकाल कसा कुठे आणि कधी बघायचा हे बघितलं नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

  मुंबई, 08 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही मिनिटं उरले आहेत. आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन बघू शकणार आहात. पण अजूनही तुम्ही निकाल कसा कुठे आणि कधी बघायचा हे बघितलं नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
  इथे बघा निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे ग निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ हा लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. MH BOARD 12TH RESULT LIVE: बारावीच्या परीक्षेत मुंबईचा निकाल सर्वांत कमी; कुठला विभाग अव्वल? निकालाचे काही IMP अपडेट्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण वोभाग्न आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 90.91% टक्के लागला आहे. धक-धक करने लगा..... निकालाची वेळ जशी जशी जवळ उयेतेय तशी विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढू लागली आहे. आपला निकाल चांगला येईल का? चांगले मार्क्स मिळतील का या भीतीनं विद्दयार्थ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. मात्र टेन्शसने घेऊ नका. निकाल बघताना कोणतीही गडबड करू नका. शांतपणे तुमचा रोल नंबर भर आणि तुमचा निकाल बघा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career, Exam Fever 2022, Exam result

  पुढील बातम्या