Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: अवघ्या काही क्षणात शिक्षण विभागाची पत्रकार परिषद; काय असतील महत्त्वाच्या गोष्टी?

MH BOARD 12TH RESULT: अवघ्या काही क्षणात शिक्षण विभागाची पत्रकार परिषद; काय असतील महत्त्वाच्या गोष्टी?

Maharashtra HSC Result 2022: सकाळी अकरा वाजता शालेय शिक्षण विभागातर्फे महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत यंदाच्या निकालासंदर्भातील काही महत्त्वाची माहिती देणार आहेत.

  मुंबई, 08 जून: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC class 12 result) आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे.
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी म्हणजेच सकाळी अकरा वाजता शालेय शिक्षण विभागातर्फे महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत यंदाच्या निकालासंदर्भातील काही महत्त्वाची माहिती देणार आहेत. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates काय असतील पत्रकार परिषदेतील मुद्दे यंदाचा एकूण निकाल किती टक्के आहे. तसंच यंदा कोणता विभाग निकालाच्या टक्केवारीत अव्वल आहे. कोणत्या विभागाचा निकाल कमी आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी काय. यासह इतर काही म्हह्त्वाच्या मुद्द्यांवर ही पत्रकार परिषद होणार आहे.
  काय होता गेल्या वर्षीचा निकाल गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 99.63% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 99.45% इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 99.91% होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 99.83% आणि बारावी एमसीव्हीसी निकाल 98.80% इतका होता. एकूणच काय तर मागील वर्षी [परीक्षा झाल्या नसल्या तरी निकाल मात्र ऐतिहासिक पद्धतीनं अधिक होता.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

  पुढील बातम्या