Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: विद्यार्थ्यांनो, मिळालेले मार्क्स कमी वाटताहेत? टेन्शन नको; पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज

MH BOARD 12TH RESULT: विद्यार्थ्यांनो, मिळालेले मार्क्स कमी वाटताहेत? टेन्शन नको; पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज

काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 08 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुन 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. या परीक्षेचे निकाल उशिरा लागण्याची चिन्हं होती, मात्र आता बारावीच्या निकालाची जाहीर झाली आहे. आजच बारावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. विद्यार्थ्यांचू निराशा होते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. तसंच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे.
    अशी असेल रिचेकिंग प्रोसेस पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत. यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत. यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.
    कुठे बघता येईल निकाल महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 12वीचे निकाल 2020 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी, 12वी 2021 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News

    पुढील बातम्या